वाद टोकाला! 'अस्तित्वावर बोट ठेवलं तर ते छाटू...'

Bachchu kadu : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि बच्चू कडूंमधला (Bachchu kadu) वाद आता टोकाला पोहोचलाय. रवी राणांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. 

Updated: Oct 27, 2022, 07:50 AM IST

bacchu_kadu_vs_ravi_rana

Bacchu Kadu vs Ravi Rana : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि बच्चू कडूंमधला (Bachchu kadu) वाद आता टोकाला पोहोचलाय. रवी राणांनी केलेल्या आरोपांनंतर बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. माझ्या अस्तित्वावर बोट ठेवाल तर बोटं छाटू असा थेट निर्वाणीचा इशाराच बच्चू कडूंनी दिलाय. राणांनी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे अन्यथा आपण मोठी घोषणा करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. तर रवी राणा यांनी थेट फडणवीसांचं नाव घेतलं अन् उत्तर दिलंय. असल्या धमक्यांना मी घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहे. त्यांनी मला बोलावलं तर मी जरूर जाईल, असं राणा (Ravi Rana) म्हणालेत. 

नागपुरात काय म्हणाले बच्चू कडू? 

नागपूर प्रेस क्लबमध्ये (Nagpur Press Club) आयोजित पत्रकार परिषदेत यांनी रवी राणा यांच्या आरोपांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, अपक्ष आमदार रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस भूमिका घेतली नाही तर, आपण मोठा धमाका करु असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.  (bacchu kadu vs ravi rana nagpur Big announcement on November 1st nmp)

रवी राणांनी काय आरोप केला ? 

अमरावतीचे (Amravati) अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर आमदार रवी राणा  आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वॉर तीव्र स्वरूपात वाढलं आहे

1 नोव्हेंबरपर्यंत राणांनी पुरावे न दिल्यास...

बच्चू कडू म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय. मात्र जर माझ्यावर आरोप होत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. एक नोव्हेंबरपर्यंत माझ्यावरील भ्रष्टाचाराचे केले आरोपाचे पुरावे सादर केले नाही तर आपण कोर्टात धाव घेणार असल्याचेही यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले.

आणखी ट्वीस्ट

बच्चू कडू म्हणाले की, बिनबुडाचे आरोप करुन प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न कोणी करु नये. माझ्या संपर्कात सध्या सरकारमध्ये नाराज असलेले सात ते आठ आमदार असल्याचा दावाही यावेळी बच्चू कडू यांनी केल्यानंतर आणखी ट्वीस्ट वाढलं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात 1 नोव्हेंबरला बच्चू कडू कोणता धमाका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.