मुंबई : गेल्या वर्षभरात स्मार्टफोनमध्ये शिओमीच्या अनेक मोबाईल्सचा प्रचंड खप झाला.
दरम्यान शिओमी या चायनीज मोबाईल कंपनी एमआई 5X मध्ये अपग्रेडेड व्हेरिएंट येण्याची शक्यता आहे. मात्र आता Mi 6X मोबाईलचेदेखील काही फोटो लीक झाले आहेत.
लीक झालेल्या फोटोंनुसार शिओमीचा नवा मोबाईल आयफोन X प्रमाणे ड्युएल कॅमेरा सेटअप करणार आहे. चीनमध्ये मायक्रो ब्लॉगिंग साईट वीबो आणि ऑनफोन्सवर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
एमआय 5X हा मोबाईल काही बाजारांमध्ये एमआय ए1 म्हणून लॉन्च करण्यात आला आहे. भारतामध्येही हा फोन एमआय ए1 म्हणून लॉन्च झाला आहे. तर Mi 6X हा मोबाईल Mi A2 च्या नावाने लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये व्हर्टिकल ड्युएल कॅमेरा सेटअप करण्यात आला आहे. कॅमेर्याजवळ फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Mi A1 मध्ये Android one स्टॉक एंड्रायड ही ऑपरेटिंग सिस्टिम असेल.
2.5 डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
5.5 इंच फुल एचडी डिस्प्ले
4 GB रॅम, 64 जीबी इंटरनल मेमरी
मायक्रो एसडी कार्डसोबत 128 जीबी एक्सपान्ड क्षमता
हायब्रीड ड्युएल सिम स्लॉट
पावर बॅकअपसाठी 3080 mAh ची बॅटरी
1.2 मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे असतील. त्यापैकी एकामध्ये f 2.2 अपर्चर वाईड अॅंगल लेन्ससोबत तर दुसरा f 2.6 अपर्चर टेलीफोटो लेन्सवाला मोबाईल आहे.
चॅटिंग आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा.
मोबाईल कंपनीच्या दाव्यानुसार, या फोनचा कॅमेरा आयफोन 7 आणि वनप्लस 5 पेक्षा अधिक चांगल्या प्रतीचा आहे.