व्हॉट्सअ‍ॅपचं हे व्हर्जन चुकूनही डाऊनलोड करू नका !

आजकाल आबालवृद्धांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हमखास केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप जगभर लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. मात्र गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअ‍ॅपच्या नावाचा वापर करून एक अ‍ॅप थर्ड पार्टीसोबत वैयक्तिक माहिती शेअर करत आहे.  

Updated: Apr 4, 2018, 03:29 PM IST
व्हॉट्सअ‍ॅपचं हे व्हर्जन चुकूनही डाऊनलोड करू नका ! title=

मुंबई : आजकाल आबालवृद्धांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हमखास केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप जगभर लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. मात्र गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअ‍ॅपच्या नावाचा वापर करून एक अ‍ॅप थर्ड पार्टीसोबत वैयक्तिक माहिती शेअर करत आहे.  

थर्ड पार्टीसोबत शेअर होते माहिती 

मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, इंटरनेटवर खोट्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर होत आहे. Malwarebytes Lab च्या रीपोर्टनुसार, व्हॉट्स अ‍ॅप प्लस हे अ‍ॅप युजर्सची वैयक्तिक माहिती घेते. हे अ‍ॅप  Android/PUP.Riskware.Wtaspin.GB या अ‍ॅपचं ते व्हेरिएंट आहे.    

एपीके फाईलमध्ये होते इंस्टॉल 

एका लिंकच्या माध्यमातून शेअर होणारे व्हॉट्स अ‍ॅप प्लस हे अ‍ॅप एपीके फाईलमध्ये इंस्टॉल होते. या अ‍ॅपच्या यूआरएल आणि हॅन्डलसोबत गोल्ड कलरचा लोगो दिसतो. ‘Agree and continue’ वर क्लिक केल्यानंतर आऊट ऑफ डेट दाखवले जाते. 

अ‍ॅपवर     Please go to Google Play Store to download latest version' असं लिहलेलं दिसतं. यावर ओके क्लिक केल्यानंतर तुम्ही आपोआप दुसर्‍या वेबसाईटवर जाता. तेथे काही अरबी भाषेत दिसेल. 'Watts Plus Plus WhatsApp’डाऊनलोड करण्यासाठी ही वेबसाईट आहे. 
   
Malwarebytes Lab रिपोर्टमध्ये अ‍ॅपमध्ये मेसेज लपवण्यासाठी, मेसेज टाईप करण्यासाठी, टेक्स्ट वाचण्यासाठी खास ऑप्शन देण्यात आला आहे. अ‍ॅप काम कसे करते ? त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.