व्होडाफोनचा 399 रुपयात 90 जीबी डेटा

मोबाईल कंपन्यांमध्ये ग्राहकांना कमीत कमी पैशांत जास्तच जास्त दिवस जास्त डेटा देण्याची स्पर्धा नाही, तर युद्धच सुरू आहे.

Updated: Oct 16, 2017, 11:19 AM IST
 व्होडाफोनचा 399 रुपयात 90 जीबी डेटा title=

मुंबई : मोबाईल कंपन्यांमध्ये ग्राहकांना कमीत कमी पैशांत जास्तच जास्त दिवस जास्त डेटा देण्याची स्पर्धा नाही, तर युद्धच सुरू आहे.

व्होडाफोननं आता रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 6 महिन्यांपर्यंत वैध असणार आहे. तसेच यात यूजर्सला जास्तीत जास्त डेटा मिळणार आहे. 

आपल्या यूजर्ससाठी व्होडाफोननं 399 रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला तब्बल 90 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे, असं वृत्त इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाने दिलं आहे.

व्होडाफोनच्या या नव्या प्लॅननं रिलायन्स जिओ आणि एअरटेलला आणखी स्पर्धा निर्माण झाली आहे.

या प्लॅनमुळे यूजर्सला अधिक दिवस डेटा वापरता येणार आहे. व्होडाफोनचा 399 रुपयांचा प्लॅन आधी सुद्धा होता. मात्र, आता यामध्ये थोडेफार बदल करुन नवा प्लॅन बाजारात आणला आहे. 

हा प्लान फक्त नव्या ग्राहकांना दिला जातो, असेही काही नियम आहेत, तेव्हा तुम्ही व्होडाफोन गॅलरीत जाऊन याची अधिक माहिती घेऊ शकतात.