Tata Tiago EV Price Hike: टाटा मोटर्सने (Tata Motors) गतवर्षी आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केली होती. Tata Tiago EV लाँच केल्यानंतर त्याची किंमत 8 लाख 49 हजार रुपये इतकी ठेण्यात आली होती. दरम्यान ही कार लाँच केल्यानंतर कंपनीने ही फक्त सुरुवातीची किंमत असल्याचं जाहीर केलं होतं. पहिल्या 20 हजार ग्राहकांनाच या किंमतीत कार मिळणार होती. या कारला ग्राहकांचा अपेक्षेहून चांगला प्रतिसाद मिळाला आणि 20 हजाराहून अधिक लोकांनी बुकिंग केलं. आता ठरल्याप्रमाणे कंपनीने कारच्या किंमतीत वाढ केली आहे.
टाटा मोटर्सने कारच्या किंमतीत 20 हजारांनी वाढ केली आहे. यानंतर आता Tata Tiago EV ची किंमत 8.69 लाख झाली आहे. तसंच टॉर व्हेरिअंटची किंमत 11.79 लाखांवरुन 11.99 लाख झाली आहे. Tata Tiago EV वेगवेगळ्या बॅटरी पॅक आणि चार्जिंग पर्यायासह 8 Times मध्ये उपलब्ध आहे. येथे जाणून घ्या प्रत्येक व्हेरियंटची किंमत.
The Tiago.ev, India’s most affordable EV now starts at a price of INR 8.69 Lakh.
Here is the Price List for All Variants.#TataMotors #TataTiagoEV #TiagoEV @Tatamotorsev pic.twitter.com/BNmXOqojTP— Vishal Ahlawat (@vishalahlawat92) February 10, 2023
Tata Tiago EV मध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय 19.2kWh आणि 24kWh मध्ये उपलब्ध आहे. 19.2kWh वाला छोटा बॅटरी बॅक सिंगल चार्जमध्ये 250 किमी प्रवास करते. तर 24kWh बॅटरी पॅक सिंगल चार्जमध्ये 315 किमीपर्यंत प्रवास करु शकता असा दावा आहे. कार ताशी 60 किमी वेगाने प्रवास करु शकते.
चार्जिंगसाठी एकूण चार पर्याय देण्यात आले आहेत. 7.2kW चार्जरसह गाडीला 3.6 तासात 10 ते 100 टक्के चार्ज केलं जाऊ शकत. तर 15A पोर्टेबल चार्जरच्या सहाय्याने 8.7 तासात 10 ते 100 टक्के चार्ज होईल. अशाच प्रकारे DC फास्ट चार्जरच्या माध्यमातून कारला फक्त 58 मिनिटात 10 ते 100 टक्के चार्ज केलं जाऊ शकतं.
यामध्ये 7 इंचाचा इंफोटेनमेंट डिस्प्ले, Android Auto आणि Apple Carplay, क्रूज कंट्रोल, कूल्ड ग्लव बॉक्स, रेन-सेंसिंग वाइपर, ऑटो हेडलाइट्स, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स आणि 8-स्पीकर्सचा हार्मन म्यूजिक सिस्टम असे फिचर्स आहेत.