VIDEO: केवळ एक चाक असलेली धमाकेदार बाईक

आता केवळ एका चाकाची बाईक लवकरच रस्त्यांवर धावताना दिसणार आहे

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 6, 2017, 01:21 PM IST
VIDEO: केवळ एक चाक असलेली धमाकेदार बाईक title=
Image: @RYNOMOTORS

नवी दिल्ली : टोकियोमध्ये आयोजित ४५व्या मोटर शोमध्ये बाईक निर्माता कंपनी यामाहाने आपली ३ चाकी सुपरबाईक लॉन्च केली होती. दुचाकी बाईक तर सर्वच ठिकाणी पहायला मिळत आहेत. मात्र, आता केवळ एका चाकाची बाईक लवकरच रस्त्यांवर धावताना दिसणार आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

एका चाकाच्या बाईकसंदर्भात युवकांमध्ये जबरदस्त क्रेझ पहायला मिळत आहे. मोटरबाईक निर्माता कंपनीने रायनो मोटर्स (Ryno Motors)ने सिंगल व्हील मोटरसायकलचं डिझाईन केलं आहे. कंपनीने या बाईकचं डिझाईन खूपच आकर्षक आणि दमदार बनवलं आहे. या बाईकचं टेस्टिंगही करण्यात आलं आहे.

ryno, ryno single wheel bike, ryno motors, one wheel bike, one wheel bike ride
Image: @RYNOMOTORS

रस्त्यावर जबरदस्त स्पीड पकडणाऱ्या या बाईकचा बॅलंसही जबरदस्त आहे. आरामदायक सिंगल सीट असलेल्या रायनो कंपनीची ही बाईक १० मैल प्रति तास म्हणजेच १६ किमी प्रति तास या वेगाने धावते.

बॅटरीवर चालणारी ही बाईक एकदा चार्ज केल्यास तुम्ही अगदी सहजपणे तुमचा प्रवास करुन हव्या त्या ठिकाणी पोहचू शकता.

रायनो कंपनीच्या या बाईकला २५ इंच रुंद टायर आहे. सिंगल व्हिल असलेल्या या बाईकला पार्क करण्याची पद्धतही खूप मजेदार आहे. या बाईकच्या फ्रंट बंपरवर बाईकला पार्क करण्यासाठी एक खास स्टँड दिला आहे.

इतर बाईक प्रमाणे या रायनो बाईकला हेडलाईट्स, हॉर्न, पॉवर प्लग, अॅडजेस्टेबल सीट आणि ब्रेक्स देण्यात आले आहेत. या सेल्फ बॅलेसिंग बाईक अगदी सहजपणे वळवता येते. या बाईकचं वजन जवळपास ७२ किलो आहे. मात्र, ११५ किलो वजन पेलण्याची क्षमता या बाईकमध्ये आहे. ही बाईक लवकरच बाजारपेठेत दाखल होईल.