थंडीच्या दिवसांत कारमध्ये 'हा' बदल करताना दहावेळा विचार करा

car : लाखोंच्या कारमध्ये काहीही बदल करताना काळजी घेतली पाहिजे...   

Updated: Nov 11, 2022, 03:08 PM IST
थंडीच्या दिवसांत कारमध्ये 'हा' बदल करताना दहावेळा विचार करा  title=
precautions while putting heater in car

Car News : (Winter) हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ज्याप्रमाणे आपण लोकरी कपडे आणि इतर गोष्टींची व्यवस्था करुन गारव्यापासून स्वत:चा बचाव करत असतो, त्याचप्रमाणे अनेकजण त्यांच्या प्रवासादरम्यानही बऱ्याच गोष्टींची काळजी घेतात. यापैकीच एक म्हणजे कारमध्ये हिटर (Car heater) लावणं. सध्याच्या घडीला कार असणं ही बाब Luxury च्याही पुढे जाऊन एक सुविधा म्हणून अनेकांच्याच दारी उभी असल्याचं दिसत आहे. परिणामी आवश्यकतेनुसार कारमध्ये काही महत्त्वाचे बदलही केले जात आहेत. Car Heater किंवा ब्लोअर ही त्यापैकीच एक. 

हलगर्जीपणा पडेल महागात... (Precautions while using car heater)

आपल्या कारमध्ये हिटर किंवा ब्लोअर लावणं थंडीच्या दिवसांत बरंच मदतीचं ठरत असलं तरीही काही प्रसंगी ते आपल्याला जबर महागात पडू शकतं. अशाही घटना घडल्या आहेत जिथं कारमधील हिटर सुरु ठेवून झोपल्यामुळं चालकाचा मृत्यू ओढावला आहे. त्यामुळं तसूभर हलगर्जीपणाही तुम्हाला महागात पडू शकतो. 

कारमध्ये हिटर असल्यास काय काळजी घ्यावी? 

- तुम्ही कारमध्ये हिटर किंवा ब्लोअर बराच वेळ लावून बसत असाल आणि कारच्या खिडक्या बंद असतील तर कारमध्ये ऑक्सिजनची (oxygen) कमतरता निर्माण होऊ शकते.  

- तुम्ही जेव्हा कारमध्ये जास्त वेळ हिटर वापरता तेव्हा कारमध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या, नाहीतर श्वास गुदमरून (Suffocation) अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. 

वाचा : Car Tips : कार स्टार्ट करताना तुम्ही ही चूक तर करत नाही ना?

 

- कारमध्ये असताना श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत काहीच अडथळे येऊ नयेत यासाठी Car मधील On- Off Air सर्क्युलेशनचं फिचर Active ठेवा. असं केल्यास बाहेरची (नैसर्गिक हवा) हवा आत येऊन आतील हवा बाहेर जाईल. हे फिचर Active ठेवल्यामुळे कारमधील हवा खेळती राहील आणि हिटर किंवा ब्लोअर सुरू असताना दुर्घटना होण्याची शक्यता टळेल. 

- सततचा हिटर वापरणं तुमच्या आरोग्यालाही धोकादायक ठरू शकतं. यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. शिवाय सततची घुसमटही जाणवू शकते. हिटरमधून अनेक घातक वायू कारमध्ये तयार होतात त्यामुळे तुमच्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता जाणवून मोठी जिवितहानी होऊ शकते .

- सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे सततच्या हिटर वापरामुळे कारमध्ये असणारं इंधनही अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं संपतं, ज्याचा आर्थिक गणितावरही परिणाम होतो. त्यामुळं हिटर वापरताना जरा जपूनच!