जिओ युजर्सला माहित हवा हा सिक्रेट कोड

जर तुम्ही जिओ यूजर्स असाल तर मग हा एक सीक्रेड नंबर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

shailesh musale Updated: Mar 15, 2018, 08:33 PM IST
जिओ युजर्सला माहित हवा हा सिक्रेट कोड title=

मुंबई : जर तुम्ही जिओ यूजर्स असाल तर मग हा एक सीक्रेड नंबर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

हा एक असा सीक्रेड कोड आहे ज्यामुळे तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लमपासून दिलासा मिळू शकतो. रिलायंस जिओचा हा नवा कोड *409* असा आहे. या कोडच्या मदतीने तुम्ही कोणताही जिओ नंबर कोणत्याही दुसऱ्या नेटवर्कवर फॉरवर्ड करु शकता. 

जेव्हा तुमचा जिओ नंबर लागणार नाही तेव्हा तुम्ही दुसऱ्या नंबरवर हा कॉल रिसीव करु शकता. अजूनही अनेक लोकांना याची माहिती नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये *409* डायल करावा लागेल. त्यानंतर त्यानंतर ज्या नंबरवर फोन डायवर्ट करायचा आहे तो नंबर टाकावा लागेल. पण जर तुम्हाला ही सेवा बंद करायची असेल तर मग तुम्ही *410 डायल करुन ही सेवा बंद करु शकता.