अशी असणार ह्युंदाईची नवी 'सेंटा फे', पाहा किंमत आणि फिचर्स

भारतीय कार बाजारात ह्युंदाई लवकरच आपली नवी कार लॉन्च करणार आहे. ह्युंदाई सेंटा फे ही कार या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sunil Desale Updated: Mar 25, 2018, 10:51 PM IST
अशी असणार ह्युंदाईची नवी 'सेंटा फे', पाहा किंमत आणि फिचर्स title=
Image: Hyundai_Global twitter

नवी दिल्ली : भारतीय कार बाजारात ह्युंदाई लवकरच आपली नवी कार लॉन्च करणार आहे. ह्युंदाई सेंटा फे ही कार या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ह्युंदाईच्या नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोजमध्ये ह्युंदाई सेंटा फे या कारमध्ये सिग्नेचर कासकॅडिंग ग्रिलसोबतच ब्लॅक ट्रीटमेंट देण्यात आली आहे. यासोबतच ग्रिलवर क्रोम स्लॅटने काम केलं जाणार आहे.

हे आहेत सिंटा फे गाडीचे फिचर्स

ह्युंदाईच्या नव्या सेंटा फे कारमध्ये नवीन ड्युअल हेडलॅम्प्स देण्यात आलं आहे. ह्युंदाई कोनामध्ये ट्विन प्रोजेक्टर्सही असणार आहे. यासोबतच कारमध्ये ग्रिलच्या वरील बाजुला मस्क्युलर बम्पर आणि स्लीक LED लाईट्स देण्यात येणार आहेत. तर, ग्रिलच्या खालील बाजुला मोठा सेंट्रल एअर डॅम आणि प्लास्टिक क्लॅडिंग क्सिट प्लेट देण्यात आली आहे. 

असं आहे इंजिन

इंजिनचा विचार केला तर ह्युंदाईच्या सेंटा फे मध्ये 3.3 लीटर V6 इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 290hp ची पावर देतं. यासोबतच 6 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशन आणि फ्रंट व्हील-ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टमही देण्यात आली आहे. भारतातील रस्त्यांच्या दृष्टीने सर्वकाही सेट करण्यात आलं आहे. इतकचं नाही तर कारमध्ये सेफ्टी आणि कम्फर्टचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

फोक्सवॅगनच्या टिग्वॉनची टक्कर

नव्या ह्युंदाई सेंटा फे या गाडीला फोक्सवॅगनच्या टिग्वॉनसोबत स्पर्धा असणार आहे. टिग्वॉनची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत 27.98 लाख रुपये आहे. ही किंमत 31.38 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. कंपनीची ही कार मॉड्युलर ट्रांसवर्स मॅट्रिक्स (MQB) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टिग्वॉन ही गाडी केवळ डिझल इंजिनमध्ये बाजारात लॉन्च करण्यात आली आहे.