या ५ गोष्टींमुळे डॉ.कलाम म्हटले जातात लोकांचे राष्ट्रपती

डॉ. अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने देशातील तरूणाईने त्यांना सोशल मीडियावर अभिवादन केलं आहे.

Updated: Jul 27, 2017, 07:47 PM IST
या ५ गोष्टींमुळे डॉ.कलाम म्हटले जातात लोकांचे राष्ट्रपती title=

मुंबई : डॉ. अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने देशातील तरूणाईने त्यांना सोशल मीडियावर अभिवादन केलं आहे. डॉ. कलाम हे सर्वात लोकप्रिय आणि लोकांचे राष्ट्रपती म्हटले गेले.

मिसाईल मॅन म्हणूनही त्यांची ओळख होती. डॉ. अब्दुल कलाम यांनी १९८८ च्या पोखरण अणू चाचणीत महत्वाची भूमिका बजावली. डॉ. कलाम आयआयएम शिलाँगच्या विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना त्यांना मृत्यूने कवटाळलं.

डॉ. कलाम यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अशा होत्या ज्यामुळे त्यांची गणना महान लोकांमध्ये होते, त्यातील आणखी ५ गोष्टी अशा आहेत, ज्यामुळे डॉ. कलाम यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणण्यात येतं.

१) डॉ. कलाम यांनी त्यांचा पगार असा स्वयंसेवी संस्थेला दिला, ज्यातून ग्रामीण भागात विकास करता येईल.
२) शिक्षण घेत असताना न्यूज पेपर वाटण्याचं काम केलं, यातून त्यांच्या गरीब कुटुंबाला मदत झाली.
३) तिरूवअनंतपुरमला विक्रम साराभाई स्पेस सेंटरला जाताना आपल्या जुन्या चपला शिवणाऱ्या माणसाशी संवाद साधला, विचारपूस केली.
४) कलाम यांच्या घरी टेलव्हिजन देखील नव्हता, एक लॅपटॉप, वीणा, सीडी प्लेअर आणि पुस्तकं, ही त्यांच्यानंतर त्यांच्या मोठ्या भावाकडे सोपवण्यात आली. डॉ. कलामांची मृत्यूनंतर कोणतीही इच्छा नव्हती.
५) राष्ट्रपती भवनाला लागणारी इलेक्ट्रिसिटी संपूर्ण सोलर पावरने यावी यासाठी प्रस्ताव ठेवला, दुर्देवाने त्यांच्यानंतर हे कुणी पुढे नेलं नाही.

या पाच गोष्टींपेक्षाही अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे डॉ. कलाम हे भारतीय जनतेच्या मनात आदराचं स्थान निर्माण करून गेले.