Apple च्या iPhone विरोधात खटला दाखल; कोणी केली iPhone ची तक्रार? जाणून घ्या प्रकरण

एप्पलवर iPhone 12 Pro Max वर विना चार्जर फोन विकल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Updated: Oct 29, 2021, 01:17 PM IST
Apple च्या iPhone विरोधात खटला दाखल; कोणी केली iPhone ची तक्रार? जाणून घ्या प्रकरण title=
(Source: Reuters)

नवी दिल्ली : एप्पल आयफोनच्या विरोधात चीक विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी खटला दाखल केला आहे. या विद्यार्थ्यांनी एप्पल आय़फोन 12 मॅक्ससोबर चार्जर न देण्याबाबत खटला दाखल करण्यात आलाय.

एप्पल वर लावण्यात आला हा आरोप
चिनी विद्यार्थ्यांनी दावा केला की, यामध्ये सामिल युएसबी-सी वरून लाइटनिंग केबलवर गेल्याने जाहिरातींमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे आयफोन12 प्रो आणि अन्य चार्जरला सपोर्ट करीत नाही. त्यामुळे विद्यार्थी फोन चार्ज करू शकत नाही. 

एप्पलला MagSafe वायरलेस चार्जरला प्रोत्साहन द्यायचे आहे. त्यासाठी एप्पल असे करीत आहे. खरे तर मॅगसेफ वायरलेस चार्जर वायर्ड केबल चार्जरच्या तुलनेत अधिक ऊर्जा खर्च करतात.

विद्यार्थ्यांची मागणी
विद्यार्थ्यांची मागणी आहे की, एप्पलने आयफोनसोबत चार्जरचा सप्लाय करावा. त्याशिवाय विद्यार्थ्यांना न्यायालयीन लढाईसाठी लागलेल्या खर्चाची भरपाई द्यावी. 

एप्पलचे म्हणणे
एप्पलने बिजिंगमध्ये वर्च्युअल कोर्टात म्हटले की, स्मार्टफोन ब्रॅंडसाठी पावर एडेप्टर विकने ही सर्वसाधारण बाब आहे. यासाठी सरकारनेही मंजूरी दिली आहे.

चिनी विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, चायनिस ब्रॅंडच्या कंपन्यां आपल्या स्मार्टफोन बॉक्समध्ये एडेप्टर ग्राहकांच्या चॉइसनुसार उपलब्ध करून देतात. 

प्रकरण न्यायालयात
हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. आणि विद्यार्थ्यांना भरपाई मिळेल की नाही आणि एप्पल आपल्या नो चार्जर पॉलिसीमध्ये बदल करणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.