मुंबई : रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने प्लॅनच्या किमती वाढवल्यानंतर ग्राहकांमध्ये नाराजी आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांचे प्रीपेड प्लॅन्स इतके महाग झाले आहेत की, लोक त्यांचे नंबर इतर कंपन्यांकडे पोर्ट करीत आहेत. BSNL ही एकमेव कंपनी आहे. जिने आपल्या प्लॅनमध्ये कोणतेही बदल केलेले नाही.
BSNL चा अशाच एका प्लॅनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये युजरला कमी किंमतीत 395 दिवसांची वैधता मिळते आणि त्यासोबत अनेक फायदेही मिळतात. जाणून घेऊया या प्लॅनबद्दल..
BSNLचा 797 रुपयांचा प्लान 395 दिवसांच्या वैधतेसह मिळतो. लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून BSNL ने अतिरिक्त 30 दिवसांची वैधता ऑफर करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांनी 12 जून 2022 पर्यंत प्लॅनची निवड केली तरच त्यांना अतिरिक्त वैधता मिळू शकेल.
BSNLच्या 797 रुपयांच्या प्लॅनमध्ये पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/दिवस मिळतात. (BSNL Rs 797 Plan Benefits)
60 व्या दिवसानंतर, डेटाचा वेग 80 Kbps पर्यंत कमी होतो. आधी सांगितल्याप्रमाणे, प्लॅन अंतर्गत ऑफर केलेला डेटा आणि कॉलिंग फायदे 60 दिवसांनंतर संपतात, परंतु सिम सक्रिय राहते.
Vodafone Idea चा 1799 रुपयांचा प्लान आहे. ज्यामध्ये 365 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, 24GB डेटा आणि 3600SMS उपलब्ध आहेत. एअरटेलकडेही त्याच किंमतीचा प्लॅन आहे.
याशिवाय Jio चा 2545 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 1.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिन 365 दिवस उपलब्ध आहेत.