Aadhar Card Update: तुमचे आधार कार्ड 10 वर्ष जुने आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. आता तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 14 जूनच्या आधीच फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करु शकता. याची संपूर्ण प्रोसेस काय आहे? जाणून घेऊया.
UIDAIने ट्विट करत ही माहिती दिली आहे. आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्याच्या तारखेत वाढ केली आहे. आता तुम्ही 14 जून 2024 पर्यंत फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करु शकता. UIDAIच्या माहितीनुसार 10 वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते. आधार कार्डवर नाव, पत्ता, जन्मतारीख सर्व काही योग्य आणि खरं असणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे महत्त्वपूर्ण काम अडू शकते.
आधार कार्ड हे एक सरकारी दस्तावेज आहे. या कागदपत्राची गरज बँकेच्या कामांपासून ते शाळा-कॉलेजच्या अॅडमिशन व पासपोर्ट बनवण्यासाठीदेखील करु शकता. त्याचबरोबर प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी ते तिकिट बुक करण्यासाठीही आधार कार्डचा वापर केला जातो.
जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही गडबड असेल किंवा नावात बदल करायचा असेल तर आता घर बसल्याही तुम्ही ही चुक दुरुस्त करु शकता. घर बसल्याच नाव, पत्ता, जन्मतारीख बदलू शकता. जर तुम्ही 14 जूनच्या आधी अपडेट करत आहात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाही. मात्र या तारखेनंतर कोणतेही बदल केल्यास तुम्हाला शुल्क भरावे लागतील.
तुम्ही घरबसल्या आधार कार्ड अपडेट करत आहात तर UIDAIच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्हाला घर बसल्या आधार कार्ड अपडेट करायचे असल्यास जवळच्या सेवा केंद्रात जाऊन बदल करु शकतात. त्यासाठीही तुम्हाला फी द्यावी लागणार नाहीये.
- माय आधार पोर्टल (myAadhaar Portal)
- आधार अॅप (mAadhaarApp)
- सगळ्यात पहिले UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा
- तिथे तुम्हाला एक फोन नंबर टाकाला लागेल
- फोन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल
- ओटीपी टाकल्यानंतर होम स्क्रीनवर अनेक पर्याय दिसतील.
- त्यानंतर आधार कार्डवर जे अपडेट करायचे आहे त्यावर क्लिक करा
- हवी असलेली माहिती तिथे भरा आणि सबमिट बटण प्रेस करा
- त्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट
- शाळा किंवा कॉलेजचे प्रमाणपत्र
- पॅनकार्ड
- मतदानाचे कार्ड
- दहावीचे प्रमाणपत्र