verbal rapprochement

भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये शाब्दिक जवळीक; सिग्नल नेमके कुणासाठी

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपात काहीतरी घडतंय का अशी चर्चा सुरु झालीये. उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये राजकीय ब्रेकअप झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून त्यांचा जुना मित्र असलेल्या भाजपला काही सिग्नल दिले जाऊ लागलेत. उद्धव ठाकरे चुकीच्या विचारधारेच्या लोकांसोबत गेल्याचा भाजपचा कायमचा आक्षेप आहे. निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्वबळावर निवडणूक लढण्याचा विचार असल्याचं सांगितलं.

Dec 2, 2024, 09:41 PM IST