कलमाडी जाणार 'ऑलिम्पिक'ला...
सुरेश कलमाडी आता ऑलिम्पिकच्या मैदानात दिसणार आहेत. कारण आता त्यांना भारताबाहेर जाण्याची परवानगी मिळालीय. दिल्ली कोर्टानं ही परवानगी दिलीय.
Jul 13, 2012, 04:47 PM ISTकलमाडी लढणार पुन्हा लोकसभा
पुणे महापालिकेत झालेल्या रणकंदनावर अखेर सुरेश कलमाडीही बोलले. पुण्याचा विकास करताना मला कुणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणुकीपासून मी दूर होतो, सक्रीय असतो तर काय झाले असते याचा सगळ्यांनाच अंदाज आहे, असं सांगत पुढची निवडणूक लढवण्याचा निर्धारही त्यांनी जाहीर केला.
Jun 11, 2012, 08:29 PM ISTकलमाडी २०१४ ची लोकसभा लढवणार
राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळ्याचा ठपका असलेले सुरेश कलमाडी पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार आहेत.२०१४ ची लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं कलमाडींनी सांगितल. पण कॉमनवेल्थ घोटाळ्यात भरपूर गोलमाल करणा-या कलमाडींना काँग्रेस आणि पुण्याची जनता कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mar 9, 2012, 11:21 PM ISTकलमाडींना हायकमांडचा लगाम
कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी नऊ महिने तिहारमध्ये मुक्काम ठोकलेल्या सुरेश कलमाडींच्या पुणे आगमनात मोठा अडथळा निर्माण झालाय. काँग्रेसच्या हायमकमांडनं कलमाडींना पुणे जाण्यास परवानगी नाकारलीय. सुरेश कलमाडींच्या बोलण्यावरही काँग्रेसकडून निर्बंध घालण्यात आल्याचं समजतंय.
Jan 27, 2012, 03:44 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर कलमाडींना जामीन
कॉमनवेल्थ घोटाळ्यातील प्रमुख माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाच लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना हा जामीन मिळाला आहे.
Jan 19, 2012, 12:50 PM ISTनिवडणुकीची धामधुम, काँग्रेस भवनात मात्र सामसुम
महापालिका निवडणुकीच्या मतदानाला एक महिन्यांहून कमी कालावधी उरला आहे. निवडणूक अशी तोंडावर आली असताना असताना काँग्रेस भवनात सध्या शुकशुकाट पहायला मिळत आहे.
Jan 19, 2012, 08:31 AM ISTगडकरी- मुंडे वाद मिटवायला 'समन्वय समिती' !
पुण्यात मुंडे आणि गडकरी गटांतले वाद मिटल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादावर तोडगा म्हणून एका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे, पण समन्वय समित्यांचा इतिहास पाहता त्यांच्यामध्येच समन्वय नसल्याचं समोर आलं आहे.
Jan 12, 2012, 06:20 PM ISTकलमाडी-राजा यांनी घेतला खीर, हलव्याचा आस्वाद
कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी आणि 2 G स्पेक्ट्रम प्रकरणी अटकेत असलेले ए.राजा यांनी तिहार जेलमध्ये नवर्षाचे स्वागत खास भोजनाचा आस्वाद घेत केलं. कलमाडी आणि राजा यांच्यासाठी पनीर, खीर, हलवा असा खासा बेत होता.
Jan 1, 2012, 07:11 PM IST