nashik

मनसेला नगरसेवकांचा दे धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश

मनसेतून शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख तसेच नाशिकचे मनसे नगरसेवक शोभना शिंदे आणि नीलेश शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला. 

Sep 10, 2014, 09:34 AM IST

अरे बापरे, मनसेचे 37 नगरसेवक अज्ञातस्थळी

नाशिक मनपाची महापौर पदासाठी 12 सप्टेंबरला  निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्कराव्या लागलेल्या मनसेला आता आपले नगरसेवक सांभाळण्याची वेळ आलीय. मनसेला नगरसेवकांच्या पळवापळवीची भिती सतावत आहे. त्यामुळे मनसेचे 37 नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झालेत.

Sep 4, 2014, 09:10 AM IST