jammu

काश्मीरमधील फुटीरतावादी नेते आता गेले कुठे?

काश्मीर महापुरात फुटीरतावादी कुठेतरी नाहीसे झाले आहेत. कायमच सरकारविरोधात आक्रमक होणारे हे फुटीरतावादी नेते कुठे गायब झाले, कुणालाचं माहित नाही. त्यामुळेच हे फुटीरतावादी नेते गेले कुठे असा सवाल उपस्थित होतोय. त्याचप्रमाणे लपून दगडफेकीचं प्लानिंग तर करत नाहीत ना ?  

Sep 14, 2014, 04:53 PM IST

काश्मीर पुरातील दीड लाख नागरिकांना वाचविण्यास यश

काश्मीर आणि जम्मूमध्ये मुसळधार कोसळलेल्या पावसाने पूर परिस्थितीने हाहाकार उडवला. पुरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात लष्कराने यश मिळविले. पुरात अडकलेल्यापैंकी 1.42 लाख नागरिकांचे जीव वाचविण्यात यश आले.

Sep 13, 2014, 09:26 PM IST

गूगलच्या 'पर्सन फाईंडर'ची जम्मू पूरग्रस्तांना मदत!

जम्मू काश्मीरमधल्या पुरात अडकलेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी गूगलचं एक अॅप्लिकेश तुम्हाला मदत करू शकतं.

Sep 10, 2014, 03:48 PM IST

जम्मू-काश्मीरच्या पुरात 122 मुंबईकर फसलेत

जम्मू-काश्मीरच्या पुरात महाराष्ट्रातले 124 जण अडकल्याचं स्पष्ट झालंय. त्यातले 122 जण मुंबईकर आहेत. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्यांसंबंधी राज्य सरकार जम्मू काश्मीर सरकारच्या संपर्कात आहे. अडकलेल्यांमध्ये डोंबिवलीच्या शिंदे परिवाराचाही समावेश आहे. 

Sep 10, 2014, 08:11 AM IST

काश्मीरमध्ये हाहाकार, पुरामुळे चार लाख नागरिक अडकले

 जम्मू काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागात अजूनही जवळपास चार लाख नागरिक अडकले आहेत. बचावकार्यात आत्तापर्यंत 43,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. तर मृतांचा आकडा 200 वर गेल्याची माहिती मिळत आहे.

Sep 10, 2014, 08:01 AM IST

महाराष्ट्राकडून जम्मू पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत

महाराष्ट्राकडून जम्मू पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत 

Sep 9, 2014, 03:23 PM IST

जम्मूत १७५ पेक्षा जास्त बळी, महाराष्ट्राकडून १० कोटींची मदत

पृथ्वीवरील स्वर्ग समजला जाणा-या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या पुरानं थैमान घातलंय. गेल्या 60 वर्षांतला सर्वात भयानक असा पूर जम्मू-काश्मीरमध्ये आलाय. या पुरानं १७५ पेक्षा जास्त बळी घेतलेत. महाराष्ट्र सरकार १० कोटी रुपयांची मदत करणार आहे.

Sep 9, 2014, 08:34 AM IST

राजनाथ सिंग यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा

राजनाथ सिंग यांनी केला पूरग्रस्त भागाचा दौरा

Sep 6, 2014, 05:50 PM IST

जम्मूतील पुरात 70 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरला पाऊस आणि पुराचा तडाखा चांगलाच बसलाय. पुरात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झालाय. तर 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस अजूनही बेपत्ताच आहे. एनडीआरएफच्या सहा टीम्स दिल्लीहून रवाना झाल्यात. पुरामुळे जम्मू-श्रीनगर हायवे ठप्प झालाय.

Sep 5, 2014, 12:53 PM IST

जम्मूत जोरदार पाऊस, ८ जणांचा मृत्यू

जम्मू परिसरात आज मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे पूर आणि भूस्खलनामुळे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला. पावसाचा तडाखा 23 गावांना बसलाय. पुराचा धोका कायम असल्याचे इशारा देण्यातआला आहे. 100 पेक्षा जास्त लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे.

Sep 4, 2014, 01:02 PM IST

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरूच, भारताकडून चोख प्रत्युत्तर

सीमाक्षेत्रात पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. शनिवारी रात्री जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तान सैन्याकडून BSFच्या चौक्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. 

Aug 24, 2014, 12:05 PM IST

बस दरीत कोसळली; 17 जण ठार

जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू भागात मंगळवारी सकाळी एक प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळून भीषण अपघात झालाय. या भीषण दूर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी अवस्थेत आहेत.

May 20, 2014, 11:13 AM IST

एक्झिट पोल म्हणजे टाईमपास - ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलनं केलेली भविष्यवाणी ‘टाईमपास’ असल्याचं म्हटलंय.

May 13, 2014, 03:11 PM IST

अतिरेकी हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद

श्रीनगरमध्ये पुन्हा अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाला टार्गेट केले. अतिरेक्यांनी केलेल्या हल्यात दोन जवान शहीद झाले. गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर हा हल्ला करण्यात आला.

Nov 7, 2013, 08:47 PM IST

पाककडून गोळीबार सुरूच, एक जवान शहीद तर ६ जखमी

पाकिस्तानी सैन्याने मंगळवारी रात्री प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) आरएस पुरा सेक्टरमधील भारतीय सैन्यांच्या चौकीवर पुन्हा गोळीबार केलाय. या गोळाबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला असून सहा जवान जखमी झाले आहेत. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.

Oct 23, 2013, 10:25 AM IST