काश्मीरमध्ये हाहाकार, पुरामुळे चार लाख नागरिक अडकले

 जम्मू काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागात अजूनही जवळपास चार लाख नागरिक अडकले आहेत. बचावकार्यात आत्तापर्यंत 43,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. तर मृतांचा आकडा 200 वर गेल्याची माहिती मिळत आहे.

Updated: Sep 10, 2014, 09:59 AM IST
काश्मीरमध्ये  हाहाकार, पुरामुळे चार लाख नागरिक अडकले title=

जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागात अजूनही जवळपास चार लाख नागरिक अडकले आहेत. बचावकार्यात आत्तापर्यंत 43,000 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. तर मृतांचा आकडा 200 वर गेल्याची माहिती मिळत आहे.

वायुदलाची 61 चॉपर्स, तसंच मालवाहू विमानांनी आत्तापर्यंत बचावकार्यासाठी 354 फे-या केल्या आहेत. संरक्षण दलांचे जवळपास एक लाख जवान बचावकार्यासाठी अहोरात्र झटत आहेत. हवामानात गेल्या काही तासांत सुधारणा झालीय, त्यामुळे श्रीनगर आणि जवळपासच्या काही शहरात पाण्याची पातळी खालावली आहे. ही बाब बचावकार्याच्या दृष्टीनं समाधानाची आहे. बचावकार्यात आर्मीच्या 110 बोटी आणि एनडीआरएफच्या 148 बोटी तैनात आहेत. पण अजूनही या बोटींची संख्या कमी पडत असल्याचीही तक्रार केली जात आहे.

नवी दिल्लीहून अजूनही बोटी पाठवण्यात आल्याची माहिती आर्मीच्या प्रवक्त्यांनी दिलीय. शिवाय काश्मीर आणि लडाखला जोडणारा श्रीनगर-लेह महामार्गावरील वाहतूक देखील सुरू झालीय... दरम्यान काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी एअर इंडियाने मोफत प्रवास जाहीर केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.