hit and run case 0

सलमानला ५ वर्षांची शिक्षा : बॉलिवूड हवालदील, २५० कोटींचा फटका

अभिनेता सलमान खानला याला हिट अॅण्ड रन प्रकरणी ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्याने बॉलिवूडला फटका बसला आहे. तब्बल २५० कोटी रुपयांचे चित्रपटांचे भवितव्य अधांतरी असणार आहे.

May 6, 2015, 02:17 PM IST

अपडेट : जामीन मिळाल्यानंतर सलमान घरी परतला!

अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणाचा निकाल आज जाहीर झालाय. हिट अँड रन प्रकरणी सलमान दोषी असून त्याला 5 वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावलीय. 

May 6, 2015, 08:54 AM IST

लायसन्स नसताना सलमान चालवत होता गाडी

काळवीट शिकार प्रकरणी ठपका ठेवलेला अभिनेता सलमान खान यांच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नव्हता, अशी माहिती पुढे आली आहे. याबाबत साक्ष आरटीओ अधिकार्‍याने सोमवारी सत्र न्यायालयात दिली.

Feb 17, 2015, 08:13 AM IST

सलमानचं हिट अॅण्ड रन महिन्याभरात निकाली काढा - कोर्ट

अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाला १३ वर्ष झाले आहेत, तेव्हा महिन्याभरात प्रकरण निकाली काढा, अशा सूचना सत्र न्यायालयाने सरकारी वकिलांना दिल्या आहेत. याबाबत वकिलांनीही सकारात्मक उत्तर दिलं असल्याचं सांगण्यात येतंय.

Nov 24, 2014, 02:27 PM IST

सलमान खाननं त्यादिवशी ५०० रुपये ‘टीप’ दिली - साक्षीदार

ज्या रात्री सलमानच्या गाडीला अपघात झाला त्या रात्री हॉटेलमध्ये आलेल्या सलमान खानला मी पार्किंग तिकीट फाडून दिलं होतं. त्यावेळी सलमाननं मला ५०० रुपये ‘टीप’ही दिली. मात्र हॉटेलमधून निघून जाताना गाडी कोण चालवत होतं हे आपण त्यावेळी पाहिलं नाही, अशी साक्ष जुहू इथल्या हॉटेलच्या पार्किंग स्लॉटमध्ये काम करणार्यात कर्मचार्याणनं आज सत्र न्यायालयात दिली. 

Oct 10, 2014, 12:13 PM IST

सलमान हिट अॅंण्ड रन प्रकरण : साक्षीदार जबाबाची मूळ प्रतच हरवली

सलमान हिट अॅंण्ड रन प्रकरणात मुंबई पोलिसांनी मुंबई सत्र न्यायालयात एक मोठा खुलासा केलाय. सलमान खान हिट अॅंण्ड रन प्रकरणातील 63 पैकी फक्त 7 साक्षीदारांच्याच जबाबाची मूळ प्रत पोलिसांकडे आहे इतर 56 साक्षीदारांच्या जबाबाची मूळ प्रतच हरवली आहे.

Aug 21, 2014, 05:59 PM IST