gopinath munde

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसच भाजपचे नेते - मुंडे

भाजपमधील सुंदोपसुंदी आता नेत्यांकडून व्यक्त होत असतांना दिसून येत आहे.

Mar 16, 2014, 07:34 PM IST

मुख्यमंत्री झालो तरच येणार - गोपीनाथ मुंडे

‘महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार असून, मीच मुख्यमंत्री होणार आहे,`` असं भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी जाहीर केलं. ते धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. याआधी मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता ते पद मिळालं तर घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणूनच येणार, असंही मुंडे यांनी स्पष्ट केलंय.

Mar 16, 2014, 01:22 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर... गडकरी विरुद्ध मुंडे

भाजपच्या नेतृत्वाने धावाधाव करून उद्धव ठाकरेंची मनधरणी केल्यानं तूर्तास महायुतीवरील गंडांतर टळलंय. मात्र, यानिमित्तानं महाराष्ट्र भाजपमध्येच नितीन गडकरी विरूद्ध गोपीनाथ मुंडे गट असं घमासान सुरू झालंय.

Mar 13, 2014, 03:46 PM IST

मनसेला महायुतीत घेण्याची वेळ निघून गेलीय - मुंडे

`मनसेला महायुतीत घेण्याची वेळ आता निघून गेलीय` असं म्हणत महायुतीत निर्माण झालेला नवा वाद थंड करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.

Mar 5, 2014, 04:35 PM IST

राष्ट्रवादीने सुरेश धसना बळीचा बकरा बनवला : मुंडे

राष्ट्रवादीने सुरेश धस यांना बळीचा बकरा बनवल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.

Mar 3, 2014, 04:27 PM IST

महायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात

काँग्रेसच्या सरकारने वाट लावली आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण आघाडी सरकार सध्या हिंदू धर्मीयांवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत आमचे नेते नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले.

Feb 23, 2014, 11:02 PM IST

महायुतीचा नव्या भिडुला भक्कम पाठिंबा...

राजू शेट्टी यांना अटक केली तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा महायुतीनं दिलाय. त्यामुळं शेट्टी यांना अटक झाली तर निवडणुकीच्या तोंडावर जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत.

Feb 10, 2014, 09:45 PM IST

पवारांपाठोपाठ मुंडेंचा गौप्यस्फोट; आघाडीला धक्का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केली.

Feb 9, 2014, 11:21 PM IST

अजित पवार, मुंडे, पतंगरावांच्या फ्लॅट्सना जप्तीची नोटीस

मुंबईतल्या शुभदा आणि सुखदा सोसायटींना मुंबई महापालिकेनं जप्तीची नोटीस बजावलीय. शुभदा आणि सुखदा या सोसायटींनी १६ कोटींचा मालमत्ता कर थकवल्यानं ही जप्तीची नोटीस बजावण्यात आलीय.या सोसायटींमध्ये अजित पवार आणि गोपीनाथ मुंडेंचे फ्लॅट्स आहे.

Feb 7, 2014, 07:05 PM IST

पवारांनी मुंडेंना पराभवाची आठवण करून दिली

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना पराभवाची आठवण करून दिली आहे. शरद पवार यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांनी टीका केली होती, या टीकेला हे चोख उत्तर असल्याचं सांगण्यात येतंय.

Feb 2, 2014, 04:00 PM IST

सत्तेत आल्यावर 'टोलमुक्त महाराष्ट्रा'चं महायुतीचं आश्वासन

‘राज्य सरकारनं महाराष्ट्र टोलमुक्त करावा अन्यथा सत्तेत आल्यावर आम्हीच महाराष्ट्राला टोलमुक्त करू’ असं आश्वासनंच महायुतीच्या नेत्यांनी आज बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं.

Jan 14, 2014, 07:25 PM IST

मुंडेंसारखा संधीसाधू नेता शोधून सापडणार नाही – राष्ट्रवादी

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना संधीसाधू म्हटले होते. राष्ट्रवादीने मुंडे यांना जशास तसे उत्तर दिले आहे. मुंडे यांच्यासारखे संधीसाधू व्यक्तिमत्वदेशातही शोधून सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

Dec 11, 2013, 03:17 PM IST

गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा

भाजपचे नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा मिळाला आहे. मुंडेनी केलेल्या वक्तव्यानंतर असे विधान करण्याबाबत खबरदारी घ्या, असे बजावले. मुंडेने केलेला खुलासा ग्राह्यधरून निवडणूक आयोगाने मुंडे यांना बजावून कारावाईतून सुटका केली.

Dec 11, 2013, 02:49 PM IST

दोन्ही काँग्रेस बेईमानीची औलाद – गोपीनाथ मुंडे

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी कोल्हापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात तोफ डागलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बेईमानीची औलद असून हे मंत्रीमंडळ म्हणजे अलीबाबा चाळीस चोर असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय.

Nov 25, 2013, 11:12 AM IST

काहीही झालं तरी ‘एटीएम’ तुटणार नाही – मुंडे

‘रामदास आठवले यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू, काहीही झालं तरी एटीएम तुटणार नाही, महायुती अभेद्यच राहील’ असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे म्हणालेत.

Oct 21, 2013, 06:44 PM IST