gopinath munde

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार आहे.

Jun 16, 2014, 01:10 PM IST

...जेव्हा गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांना फोन लावतात!

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी एकेकाळी भाजपचा कणा म्हणून काम पाहणाऱ्या प्रमोद महाजनांना फोन लावला... ही घटना घडली होती ‘झी मराठी’च्या ‘खुपते तिथे गुप्ते’च्या सेटवर...

Jun 12, 2014, 07:39 PM IST

साहेबांवर प्रेम करणाऱ्यांनो... : पंकजा पालवे - मुंडे

गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा पालवे मुंडे यांनी आज त्यांच्या समर्थकांना एक पत्रक काढून नियंत्रण न सोडण्याचं आवाहनं केलंय.

Jun 10, 2014, 07:09 PM IST

मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा- देवेंद्र फडणवीस

गोपीनाथ मुंडे अपघात प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांनी राजनाथ सिंहांची भेट घेतली. राजनाथ सिंहांसह सकारात्मक चर्चा झाली असून अधिकृत घोषणा गृहमंत्री करतील असं फडणवीसांनी सांगितलंय.

Jun 10, 2014, 11:25 AM IST

पांडुरंग फुंडकरांचा मुंडेंबाबत धक्कादायक गौप्यस्फोट

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना आज विधान परिषदेत भाजप आमदार पांडुरंग फुंडकर यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला.

Jun 6, 2014, 11:41 PM IST

‘एटीएम’ भंगलं… महायुतीसमोर राज ठाकरेंचं आव्हान!

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा फॉम्युर्ला गोपीनाथ मुंडेंनी यशस्वी करुन दाखवला. मुंडेंच्या अकाली निधनानं आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्रालयावर भगवा कसा फडकवायचा? असा प्रश्न फक्त भाजपलाच नव्हे, तर महायुतीला पडलाय.

Jun 6, 2014, 10:51 AM IST

`मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेत वारंवार केला बदल म्हणून...`

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेच्या मार्गात वारंवार बदल केल्यानंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय.

Jun 5, 2014, 12:26 PM IST

परळीतील दगफेकीची चौकशी करा - पंकजा पालवे-मुंडे

गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराच्यावेळी जी दगडफेक झाली ती मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. असे त्यांचे कार्यकर्ते नाही. दगडफेक करणारे मुंडे साहेबांचे समर्थक नाहीत, दगफेकीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कन्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी केली आहे.

Jun 4, 2014, 07:57 PM IST

मुंडे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही - रिपोर्ट

केंद्रीय ग्रामीणविकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे हृदय बंद पडल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना हार्ट अॅटॅक आलेला नाही तर त्यांना अंतर्गत झालेल्या जखमेमुळे त्यांना मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे.

Jun 4, 2014, 07:12 PM IST

मुंडेच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी – उद्धव ठाकरे

लोकांच्या भावना लक्षात घ्या असं म्हणत या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परळी येथे केली आहे. परळीत गोपीनाथ मुंडेच्या अंत्यविधीसाठी उद्धव ठाकरे आले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली.

Jun 4, 2014, 04:36 PM IST

अपघाताच्या सीबीआय चौकशीसाठी परळीत जाळपोळ

गोपीनाथ मुंडे यांना मुखाग्नी दिल्यानंतर परळीतील जमावाने मंत्र्यांना घेरण्यास सुरूवात केली, गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी या जमावाने केली.

Jun 4, 2014, 03:23 PM IST

देशातील किलर स्पॉट शोधा, मुंडे निधनानंतर मागणी

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर धक्का व्यक्त करतानाच सरकारने किलर स्पॉट शोधावे आणि तसा नकाशा बनवावा, अशी मागणी जीनिव्हातील इंटरनॅशनल रोड फेडरेशनने केंद्र सरकारकडे केली आहे.

Jun 4, 2014, 02:38 PM IST

तर कदाचित मुंडे वाचले असते - हर्षवर्धन

भारताचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलंय, जर ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सीट बेल्ट लावला असता, तर ते वाचले असते.

Jun 4, 2014, 01:29 PM IST

मुंडेंना व्हायचं होतं कृषीमंत्री, पण मिळालं ग्रामविकास

गोपीनाथ मुंडे यांना वास्तविक देशाचे कृषीमंत्री व्हायचे होते. त्यांना कृषी मंत्रालयातच अधिक रस होता. शरद पवार यांच्यानंतर हे मंत्रीपद आपल्याकडेच येणार, अशी अभिलाषा त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जनसंघापासूनचे जुने संघटक मित्र बिहारचे राधा मोहनसिंह यांच्याकडे हे मंत्रालय दिले.

Jun 3, 2014, 09:18 PM IST

नकळत माझंही नुकसान झालं - नारायण राणे

न कळत माझंही नुकसान झालं - नारायण राणे

Jun 3, 2014, 09:00 PM IST