floods

जम्मूतील पुरात 70 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरला पाऊस आणि पुराचा तडाखा चांगलाच बसलाय. पुरात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झालाय. तर 50 प्रवाशांना घेऊन जाणारी बस अजूनही बेपत्ताच आहे. एनडीआरएफच्या सहा टीम्स दिल्लीहून रवाना झाल्यात. पुरामुळे जम्मू-श्रीनगर हायवे ठप्प झालाय.

Sep 5, 2014, 12:53 PM IST

महापूरः हॉकी इंडियाची मदत, क्रिकेट बोर्डाची नाही दानत!

`हॉकी इंडिया` हा भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकी खेळाची संघटना आहे. या संघटनेकडे फारसा पैसा नसतानाही देशावर कोसळलेल्या संकटाची जाणीव ठेवत या त्यांनी उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तर दुसरीकडे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने मात्र कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.

Jun 26, 2013, 09:21 PM IST

सहा दिवस `तो` वडिलांचा मृतदेह पाहातच राहिला!

उत्तराखंडात झालेल्या महाप्रलयाने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. प्रचंड जिवितहानी या महाप्रलयात झालीय. निसर्गाच्या या रुद्रावतारापुढे कुणाचच काही चालू शकलं नाही...

Jun 23, 2013, 01:08 PM IST

महाराष्ट्रातील शेकडो बेपत्ता, 30 हजार सुखरुप

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उत्तराखंडात दाखल झालेत. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून आतापर्यंत 30 हजार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अद्यापही 32 हजार जण बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

Jun 22, 2013, 10:53 PM IST

अरे बापरे, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

उत्तराखंडमध्ये उद्या आणि परवा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बचावकार्य अधिक वेगानं सुरू करण्यात आलंय. केदारनाथ आणि गौरीकुंडच्या दरम्यान अडकून पडलेल्या १००० यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येतेय.

Jun 22, 2013, 07:16 PM IST

पुरानंतर..उपाशीपोटी `ते`गोठवणाऱ्या थंडीत

उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय.

Jun 20, 2013, 06:31 PM IST

गंगेचा प्रकोप, हजारोंचा जीव मुठीत

उत्तराखंडात पावसा तडाखा आणि गंगेचा प्रकोप अनेकांच्या जीवावर बेतलाय. अजून हजारो जण आपला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला.

Jun 19, 2013, 07:21 PM IST

उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार

मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.

Jun 18, 2013, 09:47 AM IST

फिलिपीन्समध्ये पुराचे थैमान, हजारो मृत्युमुखी

फिलिपीन्स मधल्या विनाशकारी पुरात १००० जण मृत्युमुखी पडल्याचं तसंच हजाराहून अधिक जण बेपत्ता असल्याचं वृत्त फिलिपीन्स सरकारने दिलं आहे. आतापर्यंत १०८० लोकं मरण पावली आहेत.

Dec 24, 2011, 08:50 AM IST