मतदान

ब्रिटनमध्ये पुन्हा पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचीच सत्ता

 ब्रिटन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॅमेरून यांच्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने ६५० पैकी ३२९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. चांगला प्रचार करून लढत चुरशीची करणाऱ्या लेबर पार्टीला २३२ जागांवर समाधान मानावे लागले. 

May 8, 2015, 03:06 PM IST

ब्रिटनमध्ये आज मतदान, निवडणुकीकडे लक्ष

जगातली सगळ्यात जुनी आणि सातत्यपूर्ण लोकशाही असलेल्या  ब्रिटन अर्थात युनायटेड किंगडममध्ये आज सार्वत्रिक निवडणूक होतेय.. 30 मार्चला विद्यमान पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांच्या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात आला.. त्यानंतर नव्या कायद्यानुसार या निवडणुका होतायत.

May 7, 2015, 10:28 AM IST

राज्यात किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत, आज निकाल

राज्यातील काही महानगर पालिका आणि ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. कडक उन्हामुळे मतदानला मोठा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, काही ठिकाणी चांगले मतदान झाले.  बदलापूर ५६, अंबरनाथ ४८, नवी मुंबई ५०, औरंगाबाद ६०, वरणगाव-जळगाव ७८ टक्के, भोकरमध्ये ७४, राजूरमध्ये ७५.८ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारण एक तासात निवडणुकीचे निकाल हाती येतील, अशी शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Apr 22, 2015, 07:24 PM IST

महापालिकांचा रणसंग्राम : नागरिकांचा मतदानासाठी दाखल

नागरिकांचा मतदानासाठी दाखल

Apr 22, 2015, 11:45 AM IST

नगरपरिषद निवडणूक : अंबरनाथ-बदलापूरमध्ये मतदान सुरू

अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होतय. 

Apr 22, 2015, 08:47 AM IST

रणसंग्राम : ७० बोगस मतदारांना शिवसैनिकांनी दिलं पकडून

महानगरपालिकेसाठी नवी मुंबई आणि औरंगाबाद शहरात मतदानाला सुरूवात झाली आहे, नवी मुंबईत १११ जागांसाठी मतदान होत आहे, तर औरंगाबादेत ११३ जागांसाठी मतदान सुरू झालंय.

Apr 22, 2015, 08:44 AM IST

चहूबाजुंनी टीकेमुळे 'मुस्लिम मताधिकारावर' शिवसेना वरमली!

मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्याच्या मागणीवरून नवा वाद पेटलाय. मुस्लिम आरक्षणाचा निर्णय रद्द करणाऱ्या सरकारविरोधात रान पेटवण्याची आयती संधी विरोधकांना मिळालीय. तर शिवसेनेनंच याबाबत आता मवाळ भूमिका घेतलीय.

Apr 13, 2015, 10:31 PM IST

मुस्लिम, आरक्षण आणि मताधिकाराचा वाद...

मुस्लिम, आरक्षण आणि मताधिकाराचा वाद... 

Apr 13, 2015, 08:22 PM IST