दाभोलकरांच्या हत्येचा तपास 'सीबीआय'कडे सोपवणार?
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी का यावर मुंबई हायकोर्ट आज निर्णय सुनावणार आहे. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.
May 9, 2014, 10:19 AM ISTनरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार
अंधश्रद्धा निर्मुलनासाठी सातत्यानं झटणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आज मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारला. दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.
Apr 26, 2014, 12:36 PM ISTदाभोलकर हत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय?
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयितांची जामिनावर सुटका झालीय. मात्र, या घटनेनं या प्रकरणाच्या पोलीस तपासाबाबतचा संशय अधिकच बळावलाय.
Apr 23, 2014, 10:04 AM ISTमारियांवरील आरोप खोटे - आरोपींची कबुली
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा गुन्हा कबुल करावा, यासाठी आपल्याला २५ लाखांची ऑफर दिलेली आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्याला या प्रकरणी पोलिसांकडून गोवण्यात येत आहे, असा दावा करणारे मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनी आपल्या वक्तव्याचा इन्कार केला आहे. पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळेच आपण असे वक्तव्य केले होते. मात्र कोणाकडून कुठलीच ऑफर आपल्याला मिळालेली नाही. पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून आपण केवळ रागातून असे वक्तव्य केल्याचं आरोपींनी कबुल केलयं .
Jan 28, 2014, 08:52 PM ISTमारियांनी दिली २५ लाखांची ऑफर- आरोपीचा आरोप
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीष नागोरी विकास खंडेलवाल यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
Jan 21, 2014, 08:34 PM ISTहत्येला चार महिनेः दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन चार महिने उलटले तरी अद्यापही त्यांच्या मारेक-यांना पकडण्यास पोलिसांना यश आलेलं नाही. दाभोळकरांच्या हत्येला चार महिने पूर्ण होत असताना, या विषयावर बोलायचे सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी टाळले आहे.
Dec 20, 2013, 09:20 AM ISTडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी गोव्यातून दोघे ताब्यात
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. शुक्रवारी दुपारी 2 वाजता गोव्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात केलीय..
Dec 7, 2013, 09:55 AM ISTडॉ. दाभोलकर हत्याकांड : कोण आहे हा मन्या नागोरी?
इचलकरंजीतील अट्टल गुन्हेगार मनिष रामविलास नागोरी याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना शस्र पुरविल्याचा दाट संशय पुणे पोलिसांना आहे. मनिष नागोरीवर बेकायदेशीर शस्त्रे विकल्याप्रकरणी आणि खून, खंडणीसारख्या अनेक प्रकरणांत कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत.
Dec 5, 2013, 09:49 AM ISTदाभोलकरांना चिमुकल्यांची अनोखी आदरांजली!
दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही. असं असलं तरी दाभोलकरांनी अंधश्रद्धेविरोधात सुरु केलेली चळवळ फोफावत चाललीय. यात साताऱ्यातल्या चिमुकल्या मंडळींनीही सिंहाचा वाटा उचललाय.
Oct 20, 2013, 05:34 PM IST`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`
एक महिना उलटला तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं नाही. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर आंदोलन सुरु केलंय.
Sep 21, 2013, 07:01 PM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : तर तपास सीबीआयकडे - मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी अन्य तपास यंत्रणांची मदत घेतली जाते. या प्रकरणात गरज पडली तर सीबीआयकडेही हे प्रकरण सोपवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. या प्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Sep 7, 2013, 09:00 AM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्या - मुंडे
पुण्यात सर्वात जास्त गुन्हेगारी आहे. चांगल्या IPS अधिका-यांना पुण्यात पोस्टिंग दिलं जात नाही, असा आरोप भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्यावा. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची उकल होणं अशक्य आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.
Sep 3, 2013, 08:56 AM IST... हा आहे दाभोलकरांच्या हत्येतील दुसरा आरोपी!
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या मंगळवारी दोन आठवडे पूर्ण होत आहेत. पण, अजूनही पुणे पोलिसांना ना या हत्येमागच्या कारणांचा उलगडा झालाय ना मारेकऱ्यांचा...
Sep 2, 2013, 05:55 PM IST‘पवारांच्या राष्ट्रवादी टोळीवरच हवी बंदी’
सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर बंदीची मागणी सनातन संस्थेने केलीय.
Aug 30, 2013, 06:33 PM ISTदाभोलकरांनी कुणाचं केलं नुकसान? पोलिसांसमोर प्रश्न
निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता एक आठवडा उलटून गेलाय. मात्र, अजुनही या प्रकरणाचा तपास अधांतरीच आहे. आता पोलिसांनी आपला मोर्चा व्यावसायिकांकडे वळवलाय.
Aug 28, 2013, 03:23 PM IST