www.24taas.com , झी मीडिया, पुणे
पुण्यात सर्वात जास्त गुन्हेगारी आहे. चांगल्या IPS अधिका-यांना पुण्यात पोस्टिंग दिलं जात नाही, असा आरोप भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्यावा. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची उकल होणं अशक्य आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला दोन आठवडे पूर्ण झालेत. मात्र आरोपींना अटक करणं तर दूरच, या प्रकरणाचे सबळ धागेदोरेही पोलिसांना मिळालेले नाहीत. दाभोलकर हत्या प्रकरणातल्या दुस-या संशयिताचं स्केच पुणे पोलिसांनी सोमवारी जारी केले आहे.
दोन हल्लेखोरांपैकी एका संशयिताचे स्केच याआधीच पोलिसांनी जारी केलंय. त्यानंतर आणखी काही प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी करण्यात आली. त्यापैकी एकानं सांगितलेल्या वर्णनावरून दुस-या आरोपीचं स्केच तयार करण्यात आलंय. दाभोलकरांच्या हत्येच्या तपासामध्ये प्रयत्न सुरु आहेत, एवढंच उत्तर पोलिसांकडून मिळत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.