दीपक केसरकर

नारायण राणेंकडे लक्ष, दीपक केसरकर सेनेत जाणार

राजीनाम्यानंतर तब्बल 15 दिवसांनी काँग्रेसनेते नारायण राणे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. राणेंचे कट्टर विरोधक दीपक केसरकरही आजच्याच मुहूर्तावर शिवबंधनात अडकणार आहेत.  याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Aug 5, 2014, 08:51 AM IST

दीपक केसरकर यांचा आमदारकीचा राजीनामा, सेनेत प्रवेश निश्चित

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा थेट विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिला. आता दीपक केसकर ५ ऑगस्टला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Aug 2, 2014, 02:54 PM IST

''हऱ्या-नाऱ्या गँगमधला नाऱ्या कोण?''

नारायण राणे यांनी काल सिंधुदुर्गमधून मला आता आमदार म्हणून निवडून तर दाखवं असं आव्हान दिलंय. या बाबतीत मला सर्वसामान्य लोकांचे कार्यकर्त्यांचे फोन आले, मी राणेंचं आव्हान स्वीकारलं आहे, हा चेहरा महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसणार नाही, याची काळजी महाराष्ट्राच्या जनतेनं घ्यावी, असं उत्तर दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना दिलं आहे.

Jul 20, 2014, 04:40 PM IST

‘ज्यांना शिवसेनेत यायचंय, त्यांनी लवकरात लवकर यावं’ - उद्धव

 

सांगली: ज्यांना शिवसेनेत यायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर यावं, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इस्लामपुरात दिलाय. ते पत्रकारांसोबत बोलत होते.

नुकताच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आपण लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. 

Jul 13, 2014, 03:09 PM IST

अखेर केसरकरांचा राष्ट्रवादीला राम-राम, शिवसेनेत करणार प्रवेश!

राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम केलाय. केसरकरांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचं जाहीर केलंय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून दीपक केसरकरांनी हे जाहीर केलंय. 

Jul 13, 2014, 01:57 PM IST

राणेंना पाडणाऱ्या केसरकरांना राष्ट्रवादीचा पाठिंबा?

लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश न मानणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना पक्ष पाठिशी घालणार, असे संकेत दिसून आलेत.

May 29, 2014, 07:58 PM IST

कोकणात राणे पराभूत, दीपक केसरकर किंगमेकर

कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांना शह दिला. हा शह त्यांच्या कामी आल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयात केसरकर यांना महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे दीपक केसरकर हिरो झाले आहेत. त्यांनी किंगमेकरची भूमिका बजावली.

May 16, 2014, 05:07 PM IST

माझं बंड पवारांविरोधात नाही - दीपक केसरकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अडचण टाळण्यासाठीच सिंधुदुर्गातल्या शरद कृषी भवन उद्धघाटनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. अपमानास्पद वागणूक मिळाल्यानंच केसरकारांनी कार्यक्रमातून माघार घेतल्याचं मानलं जात होतं.

May 14, 2014, 04:00 PM IST

सिंधुदुर्गात तणावपूर्ण शांतता, राणे-केसरकरांनी काढले उणे-दुणे

कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी या मतदारसंघात मतदान 17 तारखेला होणार आहे. या मतदारसंघात निलेश राणे विरूद्ध विनायक राऊत अशी लढत होणार आहे. मात्र, खरी लढत ही नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशीच दिसून येत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी बंडाचे हत्यार उपसत राणेंनाच शह दिल्याने रंगत वाढली आहे.

Apr 16, 2014, 09:17 AM IST

निलेश राणेंच्या पराभवासाठी शिवसेनेला मतदान करणार - केसरकर

रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव करण्यासाठी दीपक केसरकर आणि समर्थकांनी कंबर कसलीय केसरकरांचा आता शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निलेश राणेंचा पराभव करण्याचा निर्धार करत केसरकरांनी विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. तसंच लढाई अजून संपलेली नसून जिल्ह्यातून गुंड हद्दपार झाले पाहिजे, असा सणसणीत टोला त्यांनी राणेंना लगावलाय.

Apr 14, 2014, 02:16 PM IST