गोपीनाथ मुंडे

महाराष्ट्रात पुन्हा काकांविरोधात पुतण्या!

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं आता आगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसणार आहे. गोपीनाथ मुंडे किंवा पंकजा पालवे यांच्याविरोधात धनंजय मुंडेंच्या उमेदवारीवर यानिमित्तानं शिक्कामोर्तब झालंय.

Jul 2, 2013, 06:29 PM IST

दादांची टगेगिरी... पुन्हा ओलांडली पातळी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान पुन्हा एकदा पातळी सोडून वक्तव्य केलंय.

Jul 2, 2013, 09:22 AM IST

मुंडेंनी आठ कोटी आणले कुठून?- आर आर पाटील

राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी थेट मुंडेंवर निशाणा साधला आहे. आर. आर. पाटील यांनी मुंडेंच्या वक्तव्यावर टीका केली आहे. निवडणूकीसाठी मुंडेंनी ८ कोटी रुपये आणले कुठून? असा थेट सवाल त्यांनी मुंडेंना या सभेत केला आहे.

Jun 30, 2013, 07:16 PM IST

भ्रष्टाचाराचं मूळ निवणुकीत - गोपीनाथ मुंडे

भ्रष्टाचाराचं मूळ निवणुकीत असल्याचा अजब दावा भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केलाय. काही वर्षांपूर्वी आपण काही हजारांत निवडणूक लढायचो. आता मात्र खासदारकीच्या निवडणुकीत आपल्याला आठ कोटी रुपये खर्च करावे लागल्याचा गौप्यस्फोट मुंडेंनी केला.

Jun 28, 2013, 08:50 AM IST

`शुभदेतले आठ बेनामी फ्लॅट अजित पवारांचे`

मुंबईमध्ये वरळीच्या शुभदा हाऊसिंग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्यांच्या नावावर फ्लॅट घेतल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री रणजीत देशमुख यांनी केलाय.

Apr 20, 2013, 09:38 AM IST

सुखदा-शुभदा : मुंबईतला आणखी एक `आदर्श`

मुंबईत गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा वाद अजूनही शमला नसताना वरळीत सुखदा-शुभदा सोसायटीत सदस्य असलेल्या राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.

Apr 20, 2013, 09:16 AM IST

मोदींसाठी मुंडेंची `बॅटिंग`?

नितीश कुमार यांचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास विरोध नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.

Apr 14, 2013, 05:14 PM IST

गोपीनाथ मुंडेंनी घेतले उपोषण मागे

राज्यात दुष्काळाचे गहिरे संकट आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे उपनेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. आज मुंडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

Apr 9, 2013, 05:50 PM IST

गोपीनाथ मुंडेंचा उपोषणाचा इशारा

राज्य सरकारनं दुष्काळी भागात लवकरात लवकर चारा छावण्यांचे पैसे मिळावेत आणि लोकांना लगेचच मदत द्यावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडेंनी केली आहे.

Apr 2, 2013, 12:09 AM IST

गोपीनाथ काकांच्या कारखान्यावर पुतण्याचा मोर्चा!

परळीत धनंजय मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर मोर्चा काढला. शेतक-यांच्या उसाला २२५० रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसह विविध मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून वैद्यनाथ कारखान्यावर धडक दिली.

Mar 31, 2013, 11:19 PM IST

कलाकार कायद्यापेक्षा मोठी नाही – मुंडे

संजय दत्तच्या माफीला भाजपानं विरोध केलाय. कलाकार हा कायद्यापेक्षा मोठा नसतो, त्यामुळे त्याला देण्यात आलेली शिक्षा योग्य आहे, असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.

Mar 23, 2013, 12:22 PM IST

‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?

रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतला ‘टी’ आणखी पॉवरफुल्ल होणार आहे.

Mar 8, 2013, 08:43 AM IST

आम आदमीला विसरलेला अर्थसंकल्प- मुंडे

आज लोकसभेत अर्थमंत्री चिदंबरंम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे महागाईला जन्म देणारा, आम आदमीला विसरलेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा हा अर्थसंकल्प असून यामुळे सर्व सामान्यांना आणखी महागाईला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Feb 28, 2013, 08:29 PM IST

गडकरी-मुंडे भेटीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा

मुंबईतल्या भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या निवासस्थानी गडकरी आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत अर्धा तास चर्चा झाली.

Feb 8, 2013, 11:01 PM IST

राज-उद्धव एकत्र आल्यास भाजपला आनंदच- मुंडे

उद्धव आणि राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी आता भाजपही सरसावले आहे. शिवसेना-मनसेचे एकत्रिकरण व्हावे ही भाजपचीच इच्छा असल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं आहे.

Jan 30, 2013, 02:19 PM IST