मनसेला महायुतीत घेण्याची वेळ निघून गेलीय - मुंडे
`मनसेला महायुतीत घेण्याची वेळ आता निघून गेलीय` असं म्हणत महायुतीत निर्माण झालेला नवा वाद थंड करण्याचा प्रयत्न भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.
Mar 5, 2014, 04:35 PM ISTमहायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात
काँग्रेसच्या सरकारने वाट लावली आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण आघाडी सरकार सध्या हिंदू धर्मीयांवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत आमचे नेते नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले.
Feb 23, 2014, 11:02 PM ISTमहायुतीचा नव्या भिडुला भक्कम पाठिंबा...
राजू शेट्टी यांना अटक केली तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा महायुतीनं दिलाय. त्यामुळं शेट्टी यांना अटक झाली तर निवडणुकीच्या तोंडावर जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत.
Feb 10, 2014, 09:45 PM ISTपवारांपाठोपाठ मुंडेंचा गौप्यस्फोट; आघाडीला धक्का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केली.
Feb 9, 2014, 11:21 PM ISTअजित पवार, मुंडे, पतंगरावांच्या फ्लॅट्सना जप्तीची नोटीस
मुंबईतल्या शुभदा आणि सुखदा सोसायटींना मुंबई महापालिकेनं जप्तीची नोटीस बजावलीय. शुभदा आणि सुखदा या सोसायटींनी १६ कोटींचा मालमत्ता कर थकवल्यानं ही जप्तीची नोटीस बजावण्यात आलीय.या सोसायटींमध्ये अजित पवार आणि गोपीनाथ मुंडेंचे फ्लॅट्स आहे.
Feb 7, 2014, 07:05 PM ISTपवारांनी मुंडेंना पराभवाची आठवण करून दिली
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी, भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना पराभवाची आठवण करून दिली आहे. शरद पवार यांच्यावर गोपीनाथ मुंडे यांनी टीका केली होती, या टीकेला हे चोख उत्तर असल्याचं सांगण्यात येतंय.
Feb 2, 2014, 04:00 PM ISTसत्तेत आल्यावर 'टोलमुक्त महाराष्ट्रा'चं महायुतीचं आश्वासन
‘राज्य सरकारनं महाराष्ट्र टोलमुक्त करावा अन्यथा सत्तेत आल्यावर आम्हीच महाराष्ट्राला टोलमुक्त करू’ असं आश्वासनंच महायुतीच्या नेत्यांनी आज बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं.
Jan 14, 2014, 07:25 PM ISTमुंडेंसारखा संधीसाधू नेता शोधून सापडणार नाही – राष्ट्रवादी
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना संधीसाधू म्हटले होते. राष्ट्रवादीने मुंडे यांना जशास तसे उत्तर दिले आहे. मुंडे यांच्यासारखे संधीसाधू व्यक्तिमत्वदेशातही शोधून सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
Dec 11, 2013, 03:17 PM ISTगोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा
भाजपचे नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा मिळाला आहे. मुंडेनी केलेल्या वक्तव्यानंतर असे विधान करण्याबाबत खबरदारी घ्या, असे बजावले. मुंडेने केलेला खुलासा ग्राह्यधरून निवडणूक आयोगाने मुंडे यांना बजावून कारावाईतून सुटका केली.
Dec 11, 2013, 02:49 PM ISTदोन्ही काँग्रेस बेईमानीची औलाद – गोपीनाथ मुंडे
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी कोल्हापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात तोफ डागलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बेईमानीची औलद असून हे मंत्रीमंडळ म्हणजे अलीबाबा चाळीस चोर असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलंय.
Nov 25, 2013, 11:12 AM ISTमुंडेंनी केली ‘आबां’ची स्तुती, ‘दादा’वर हल्ला!
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना फोन करून त्यांचं कौतुक केलंय. गडचिरोलीच्या आदिवासींची वीज तोडू नये, अशी आग्रही भूमिका पाटील यांनी कालच्या कॅबिनेटमध्ये घेतली होती. त्याबद्दल मुंडेंनी आबांची प्रशंसा केलीये.
Oct 31, 2013, 03:18 PM ISTकाहीही झालं तरी ‘एटीएम’ तुटणार नाही – मुंडे
‘रामदास आठवले यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू, काहीही झालं तरी एटीएम तुटणार नाही, महायुती अभेद्यच राहील’ असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे म्हणालेत.
Oct 21, 2013, 06:44 PM ISTमनमोहन सिंग यांनाही अटक करा- मुंडे
मनमोहन सिंग यांच्यावरही सीबीआयने खटला भरून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली
Oct 19, 2013, 10:50 PM ISTMCA निवडणूक : शरद पवारांच्या निवडीला मुंडेंचे आव्हान
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या लढतीमध्ये बाळ महाडदळकर ग्रुपचं वर्चस्व दिसून आलं. १६ पैकी १२ जागा या गटानं पटकावल्या. तर विजय पाटील यांच्या क्रिकेट फर्स्ट पॅनलनं चार जागांवर आपलं वर्चस्व स्थापन केलं. तर दुसरीकडे भाजप नेते गोपीनाथ मुंडेनी न्यायालयात या निवडणुकीविरोधात धाव घेतली आहे.
Oct 19, 2013, 08:27 AM ISTएमसीए अध्यक्षपद निवडणुकीतून मुंडेंचा अर्ज बाद
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी एमसीए अध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या अर्जावर बीड येथील पत्ता टाकला आणि मुंडे वादात अडकले. त्यांचा हा पत्ता एमसीए निवडणुकीतून पत्ता कट ठरण्यास कारणीभूत ठरला. त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. आता मुंडे कोर्टात धाव घेणार आहेत.
Oct 17, 2013, 12:29 PM IST