इवल्याशा खडूवर बाप्पांची मूर्ती
आतापर्यंत आपण लाकडावर, दगडावर , सुपारीवर कोरीव काम करून गणपतीची मूर्ती साकारताना कलाकारांना पाहिल आहे. मात्र आता फणायावर लिहिल्या जाणाऱअया खडूवरदेखील बाप्पाची मूर्ती साकारण्याचा अविष्कार अवलिया मूर्तीकाराने साकराला आहे.
Sep 10, 2013, 01:27 PM ISTराज्यात सर्वत्र बाप्पाच्या उत्साहाला उधाण
राज्यात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची धूम आहे. मुंबईतर रात्रीपासून बाप्पाचा जयघोष सुरु आहे. मराठी भाषिकांचा प्रभाव असलेल्या लालबाग, चिंचपोकळी, परळ, दादर परिसरात तर उत्साहाला उधाण आलं होतं. उपनगरातही बाप्पाचं जोरदार स्वागत होतंय.
Sep 10, 2013, 07:32 AM ISTजेव्हा भुजबळ-सोमय्या येतात आमने-सामने!
गणपती बाप्पा कधी काय चमत्कार घडवेल, याचा नेम नाही... विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातल्या घरीही असाच एक राजकीय चमत्कार बाप्पानं घडवला. एकमेकांवर आगपाखड करणारे छगन भुजबळ आणि किरीट सोमय्या एकत्रच आले नाही तर चक्क गळाभेट करतांना दिसले.
Sep 9, 2013, 09:12 PM ISTमुंबईतले मानाचे गणपती!
गणेशोत्सव हा आता केवळ मुंबईकरांचा सण राहिलेला नाही, तर त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झालंय. सार्वजनिक मंडळांनी केलेली आरास, सजावट पाहण्यासाठी देशी-विदेशी पाहुण्यांची पावलंही मुंबईकडे वळतात. प्रभादेवीचा सिद्धीविनायक म्हणजे तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. पण गणेशोत्सवाच्या काळात विविध सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.
Sep 9, 2013, 07:26 PM ISTडॉल्बीचा नाद, भक्त पोलिसांमध्ये वाद
गणपतीचे आगमन आता आवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला आहे. या वादाच निमित्त ठरलंय ते म्हणजे डॉल्बी...
Sep 5, 2013, 06:07 PM ISTकशी करावी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना
गणेशोत्सवाच्या दिवशी स्नान करून सोनं, तांबं किंवा मातीच्या गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
Sep 4, 2013, 08:09 AM ISTमुंबईतले बाप्पा `इको फ्रेंडली`!
आता लवकरच गणपतीचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव एका आठवड्यावर आला आहे. यंदा बरीचशी मंडळं इको फ्रेंडली गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत. पर्यावरणाचा विचार करत अधिका मंडळे इको फ्रेंडली गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत.
Sep 3, 2013, 08:25 PM ISTविघ्नहर्त्याच्या मूर्तीकामात वरुणदेवाचं `विघ्न`!
सतत कोसळणाऱ्या पावसाने गणेश मूर्तीच्या निर्मितीला अडथळे येत असल्याने नागपूरच्या मुर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Sep 1, 2013, 08:19 PM ISTआता बाप्पाच्या दर्शनासाठी ड्रेसकोड!
बाप्पाचं दर्शन घ्यायचंय, मग त्यासाठी ड्रेसकोडचं पालन करा...मिनी स्कर्ट आणि लहान कपडे घालून बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही जावू शकणार नाही. हा निर्णय घेतलाय ‘अंधेरीचा राजा’च्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीनं.
Aug 26, 2013, 03:30 PM ISTसलमान वांद्राच्या घरी आणणार नाही गणपती!
अभिनेता सलमान खानच्या वांद्राच्या घरी यंदा गणरायाचं आगमन होणार नाही.गेले ११ वर्ष सलमानची बहीण अर्पिता वांद्र्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणरायाचं स्वागत करायची. मात्र यावर्षी वांद्राच्या घरी रिन्यूवेशन होत असल्यामुळे आणि ते काम वेळेत पार पडत नसल्यामुळे येथे गणरायाला आणले जाणार नाही.
Aug 22, 2013, 03:17 PM ISTयंदा गणपती तयार करा `ऑनलाईन`!
ऑन लाईन शॉपिंग, ऑन लाईन बँकिंग, ऑन लाईन बुकिंग अशा ऑनलाईनच्या जमान्यात आता ऑनलाईन गणपती मेकिंग हा नवा उपक्रम पुण्यात सुरू झालाय.
Aug 12, 2013, 07:46 PM ISTफोटो : दीपिका `एक्सप्रेस` बाप्पाचरणी लीन!
शाहरुख खान आणि दीपिका पदूकोन यांचा बहुचर्चित सिनेमा `चेन्नई एक्सप्रेस` उद्या म्हणजे शुक्रवारी रिलीज होतोय. त्याआधीच दीपिकानं मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली.
Aug 8, 2013, 05:38 PM ISTपुण्यात ढोल- ताशांच्या नाद कमी घुमणार!
पुण्यातल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक देशविदेशातल्या नागरिकांसाठी आकर्षण असते. आणि ढोल ताशांची पथकं ही या मिरवणुकीची शान असतात. यावर्षी मात्र ढोल-ताशांच्या पथकांचा आवाज कमी होणार आहे.
Jul 18, 2013, 09:46 PM ISTइकोफ्रेंडली गणपती मूर्ती नामी, पण शाडुच्या मातीची कमी!
इकोफ्रेंडली गणेशोत्सवाकडे लोकांचा कल वाढत असल्यामुळे शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी वाढतेय. मात्र शाडूच्या मातीची कमतरता भासत असल्यामुळे कारागिरांसमोर मोठा पेच निर्माण झालाय.
Jul 13, 2013, 08:33 PM ISTलिंबाचा गणेश देईल प्रत्येक कामात यश!
आपल्या घरात प्रत्येक नव्या कामाची सुरूवात करताना गणेशाची पूजा केली जाते. देवघरातील ही मूर्ती लिंबाच्या झाडापासून बनविलेली असावी, कारण...
Apr 13, 2013, 08:00 AM IST