मुंबईतले बाप्पा `इको फ्रेंडली`!

आता लवकरच गणपतीचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव एका आठवड्यावर आला आहे. यंदा बरीचशी मंडळं इको फ्रेंडली गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत. पर्यावरणाचा विचार करत अधिका मंडळे इको फ्रेंडली गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 3, 2013, 08:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आता लवकरच गणपतीचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव एका आठवड्यावर आला आहे. यंदा बरीचशी मंडळं इको फ्रेंडली गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत. पर्यावरणाचा विचार करत अधिका मंडळे इको फ्रेंडली गणेशमूर्तींची स्थापना करणार आहेत.
मुंबईमधील विलेपार्लेच्या ‘बालगोपाळ मित्र मंडळा’नं अतिशय सुंदर अशा मूर्तीची स्थापना केली आहे. १४ फुटांची भव्य अशी मूर्ती सिंहासनावर विराजमान झालेली आहे. ही मूर्ती कागदापासून तयार केली आहे. बाजूचा पूर्ण देखावादेखील कागदाचाच तयार केला आहे. पर्यावरणाचे रक्षण हा या मंडळाचा उद्देश आहे.
मुंबईमध्ये जवळपास साडे अकरा हजारांच्या आसपास सार्वजनिक गणेश मंडळं तर दीड लाखापेक्षा जास्त घरगुती गणेश मूर्तींची स्थापना होते. जास्तीत जास्त गणेशभक्तांनी इको फ्रेंडली गणेशाची स्थापना करणं आवश्यक आहे. कागदापासून आणि शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या या मूर्ती पीओपीच्या तुलनेत लवकर विरघळतात. त्यामुळे जलचरांना कुठलीही हानी होत नाही. तसंच या मूर्ती वजनानं हलक्या असतात. अशा प्रकारच्या मूर्तींमुळे पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही.
गणपतीच्या पूजेबरोबरच पर्यावरणाचंही रक्षण होणं गरजेचं झाल आहे. म्हणूनच इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी सगळ्यांचाच सहभाग आवश्यक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.