कोकणवासियांचा प्रवास आता तेजस्वी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 07:43 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक ‘तेजस एक्स्प्रेस’, २२ मेपासून धावणार
कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक ‘तेजस एक्स्प्रेस’ २२ मेपासून धावणार आहे. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच स्वयंचलित दरवाजे आणि गँग वे अशा अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.
May 20, 2017, 10:06 AM ISTकोकण रेल्वे मार्गावर आता ‘तुतारी एक्स्प्रेस’
दादार-सावंतवाडी या राज्यराणी एक्स्प्रेस रेल्वेच्या नावात बदल करण्यात आला आहे. ही गाडी ‘तुतारी एक्स्प्रेस’ या नावाने धावणार आहे.
May 20, 2017, 09:53 AM ISTकोकण रेल्वेच्या 28 स्टेशनवर मोफत वायफाय
कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर लवकरच मोफत वायफाय सेवा सुरू होणार आहे.
May 17, 2017, 08:12 AM ISTकोकण रेल्वेसाठी ४ हजार कोटी, मार्गाचे विद्युतीकरण
कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर होण्याची शक्यता अधिक आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी ४ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.
Apr 8, 2017, 11:53 PM ISTशिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी
शिमगोत्सवासाठी कोकणकडे निघालेल्या चाकरमानींसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेनं दोन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 2, 2017, 09:47 AM ISTकोकण रेल्वेची गुडन्यूज, उपलब्ध सिटची मिळणार माहिती
कोकण रेल्वे तुम्हाला उपलब्ध जागांची माहिती मिळणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी उपलब्ध करुन दिलेय.
Feb 2, 2017, 10:51 PM ISTमंगला एक्स्प्रेसमध्ये दिला मुलीला जन्म
कोकण रेल्वे मार्गावर मंगळूर-दिल्ली मंगला एक्प्रेसमध्ये संगमेश्वर-सावर्डे स्थानकांदरम्यान एका महिलेची प्रसूती झाली.
Jan 25, 2017, 09:16 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक
राज्यात मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस कोसळत असताना कोकणातही पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. या पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ता वाहतुकीला बसला आहे. कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. कुंभार्ली घाटात दरड कोसळली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरही एकेरी वाहतूक सुरु आहे.
Sep 24, 2016, 06:38 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळ्याने वाहतूक ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 11:49 PM ISTकोकणात पावसाचा धुमाकूळ, महामार्ग आणि रेल्वेची वाहतूक ठप्प
मुंबई - गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाटात दरड कोसळ्याने महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे. तर कोकण रेल्वे मार्गावर आरवली आणि संगमेश्वर दरम्यान रुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Sep 23, 2016, 10:51 PM ISTकोकणातील तरुणांना कोकण रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट बनण्याची संधी
कोकण रेल्वेने कोकणातील तरुणांना रेल्वे मोटरमन बनण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केलेय. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Sep 21, 2016, 11:23 PM ISTकोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच
मध्य आणि पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावरील १७ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात रत्नागिरी क्षेत्रातील नऊ आणि कारवार क्षेत्रातील आठ स्थानकांचा समावेश आहे.
Sep 7, 2016, 09:55 AM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेबरोबरच एसटीही फुल्ल
मुंबईत राहणारा कोकणी माणूस गणेशोत्सवात कोकणात आपल्या मूळ गावी जातो म्हणजे जातोच. सोमवारपासून गणेशोत्सव सुरू होणार असल्याने मुंबईतून कोकणात जाणा-यांची लगबग वाढली आहे. रेल्वेबरोबरच एसटीने मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी झाली आहे.
Sep 3, 2016, 09:52 AM ISTकोकणातील गणेश भक्तांसाठी खुशखबर
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वेने दादर सावंतवाडी त्रि-साप्ताहिक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी दिवा स्थानकावर थांबणार आहे.
Sep 1, 2016, 10:01 PM IST