काश्मीर

पाकिस्तानच्या २२ खासदारांच्या खोडीला भारताचं प्रत्यूत्तर

पाकिस्तानने काश्मीर मुद्यावरुन नवं कारस्थान करण्याची तयारी सुरु केली आहे. काश्मीरमध्ये सततच्या दहशतवादी कारवायांकरता पाकिस्तान प्रोत्साहन देतच असत मात्र याखेरीज पाकिस्ताननं आता वेगळंच षडयंत्र आखलं आहे.

Aug 28, 2016, 02:55 PM IST

सर्वसामान्य काश्मिरी माणसाच्या दीनवाण्या आयुष्याचे काय?

(बिग्रेडीयर हेमंत महाजन) जम्मू काश्मीरमधील जखमी झालेल्या आंदोलकांना भेटण्यास गेलेले काँग्रेसचे नेते ,माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अय्यर हे गुरूवारी  शिष्टमंडळासह श्रीनगर येथील हॉस्पीटलमध्ये आंदोलकांची विचारपूस करण्यास गेले होते.

Aug 22, 2016, 05:14 PM IST

काश्मीरमधल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट

काश्मीरमध्ये गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात 67 जणांचा बळी गेला. 45 दिवसांपासून खोऱ्यातल्या 10 जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू आहे. या चिघळलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याची विनंती करण्यासाठी आज काश्मीरमधल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचं शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. 

Aug 22, 2016, 10:52 AM IST

काश्मीरवर नाही, तर दहशतवादावर चर्चा करा - भारत

काश्मीरवर नको, दहशतवादावर चर्चा करा, असं भारताकडून पाकिस्तानला सांगण्यात आलं आहे. काश्मीरवर चर्चा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने भारतासमोर ठेवला होता, तो फेटाळून लावताना भारताने पाकिस्तानला दहतवादावर चर्चा करा, काश्मीरवर नको असं म्हटलंय.

Aug 17, 2016, 06:33 PM IST

बारामुल्लात लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

बारामुल्ला सेक्टरमध्ये रात्री अडीचच्या सुमारास दहशतवाद्यांनी सापळा रुचून लष्कराच्या एका गस्तीपथकावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत. तर जम्मू काश्मीर पोलिसांचा एक कर्मचारीसुद्धा या हल्ल्यात ठार झाला. 

Aug 17, 2016, 09:35 AM IST

काश्मीरमध्ये सैन्य घुसवा- हाफिज सईद

जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने, भारताला धडा शिकवण्यासाठी काश्मीरमध्ये सैन्य घुसवा, असं म्हटलं आहे.

Aug 16, 2016, 06:06 PM IST

पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित पुन्हा भारताविरोधात बरळले

पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली आहे.

Aug 14, 2016, 06:35 PM IST

काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदींनी मानले काँग्रेसचे आभार

सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष काँग्रेसचे आभार मानले आहेत, काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या हिंसक विरोधावर पहिल्यांदाच  नरेंद्र मोदी बोलले.

Aug 9, 2016, 09:11 PM IST

काश्मीरच्या मुद्द्यावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

"70 वर्षं स्वातंत्र्याची, याद करो कुर्बानी" या उपक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील अलीराजपूरातल्या भावरा या चंद्रशेखर आझाद यांच्या गावी आझाद यांच्या स्मृती स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावरा इथं जाहीर सभा झाली. या सभेला आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.

Aug 9, 2016, 05:05 PM IST

जम्मूत भूस्खलनात वैष्णोदेवीच्या चार भाविकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीर मधील वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भूस्खलनात चार भाविकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झालेत.

Aug 6, 2016, 09:35 PM IST

'मुलींनो बाईक चालवाल तर जिवंत जाळू'

शहरात धमकीची पत्रके काही ठिकाणी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुलींनो बाईक चालवाल, तर बाईकसह जिवंत जाळू, अशा धमकीची पत्रकं लावण्यात आली आहेत.

Aug 1, 2016, 06:09 PM IST