मुंबई : याहूने एक यादी जाहीर केली आहे. या यादीत तुम्हाला तुमच्या आवडत्या प्लेअर्सची रँक कळणार आहे.
२०१७ मध्ये विराट कोहलीची बॅट ३ फॉर्मेटमध्ये एकदम भारी चालली. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने हजारहून अधिक धावा केल्या तर वन डे क्रिकेटमध्ये त्याने १४६० रन केले. टी - २० मध्ये यंदा त्याच्या नावावर २९९ धावा नोंदवल्या गेल्या. कोहलीने यंदा एकूण २८१८ आंतरराष्ट्रीय रन आपल्या नावावर करून घेतले. कॅलेंडर इयरमध्ये सर्वात जास्त धावा बनवणारा म्हणून कोहली तिसऱ्या नंबरवर आहे.
यंदा कोहलीने ११ शतक, ३ डबल सेंच्युरी आपल्या नावावर करून घेतली. टेस्ट रँकिंगमध्ये आता तो दुसऱ्यानंबरवर आहे. वनडे आणि टी २० रँकिंगमध्ये तो पहिल्या नंबरवर आहे. २०१६ मध्ये पी वी सिंधू, साक्षी मलिक आणि दिपा कर्माकर जास्त चर्चेत आहे.
२०१७ च्या या लिस्टमध्ये धोनी दुसऱ्या नंबरवर आहे. यंदा धोनी चर्चेत येण्याच कारण म्हणजे आयपीएल. आयपीएलमध्ये जेव्हा टीम पुण्याचं कॅप्टन पद ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव स्मिथला देण्यात आलं. टीमचे मालक संजीव गोयनकाचे भाऊ हर्ष गोयनकाने धोनीवर निशाणा साधला. तेव्हा ट्विटरवर धोनीच्या समर्थकांनी हर्षला टार्गेट केलं.
या लीस्टमध्ये बॅडमिंटन खेळाडू पी वी सिंधू तिसऱ्या नंबरवर आहे. २०१६ मध्ये सिंधूने उत्त्म कामगिरी करून दाखवली होती. आपल्या शानदार अशा खेळाने प्रेक्षकांना खूष केलं आहे. सिंधूने यंदा सुपर सिरिजचा किताब आपल्या नावे करून घेतला.
टीम इंडियाचा बॅट्समन गौतम गंभीर जरी आता टीममध्ये नसला तरी मैदानाबाहेर तो आपली जबाबदारी खूप छान सांभाळत आहे. सोशल मीडियावर गंभीर योग्य वेळी आपला आवाज उठवतो. हल्लीच घाटीमध्ये शहीद झालेल्या एका जवानाच्या मुलीला दत्तक घेतले आहे.
अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्रीला नवीन कोच बनवण्यात आलं. आणि त्यांची नियुक्ती झाल्यावर रवी शास्त्री भरपूर चर्चेत आले. या कारणामुळे रवी शास्त्री ५ व्या नंबर वर आहे.
महिला टीम इंडियाची कॅप्टन मिताली राज या लिस्टमध्ये सहाव्यानंबरवर आहे. यंदा इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपनंतर महिला क्रिकेटला अधिक लोकप्रियता मिळाली. मिताली आता वनडे क्रिकेटमध्ये जगभरात नंबर वनची खेळाडू आहे.
महिला वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये हरमनप्रीत कौरद्वारे खेळले गेलेले १७१ धावा या महत्वपूर्ण ठरल्या. या रन्सने तिला अगदी रातोरात क्रिकेटमध्ये सुपरस्टार बनवलं. ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध खेळला गेलेल्या या सामनाची तुलना कपिल देवसोबत करण्यात आली. कौर ही याहूीच्या यादीत ७ व्या नंबरवर आहे.
फिक्सिंगच्या आरोपात दोषी ठरलेला श्रीसंत सध्या सामन्यांपासून दूर आहे. २०१७ हे संपूर्ण वर्ष कोर्टाच्या येरझारा घालण्यातच गेलं. हायकोर्टाकडून जरी दिलासा मिळाला असला तरीही बीसीसीआय मात्र श्रीसंतवर नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. त्याने पुर्नविचार याचिका देखील दाखल केली आहे.
या लिस्टमध्ये हे दोघे अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या यादीत आहेत. इरफान जास्त चर्चेत तेव्हा आला डेव्हा बडोद्याचे कॅप्टन पद हटवून टीममधून देखील काढण्यात आले.