नवी दिल्ली : प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घातली आहे. ही कमालीची कामगिरी त्याने मैदानात नाही तर मैदानाबाहेर केली आहे.
रोनाल्डोने फुटबॉल जगतातील प्रतिष्ठेचा बॅलन डी ऑर हा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकवला. हा पुरस्कार त्याने पाचव्यांदा पटकवला आहे. हा पुरस्कार पटकावून त्याने लिओनी मेस्सीची बरोबरी केली आहे. मेस्सीने देखील पाच वेळा या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.स्पॅनिश स्ट्रायकर रोनाल्डोनला गुरुवारी पॅरिसमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुसऱ्या स्थानावर लिओनी मेस्सी तर तिसऱे स्थान ब्राजीलच्या नेमार यानी पटकावले.
हा पुरस्कार रोनाल्डोने सलग दुसऱ्यांना जिंकला आहे. २००८ मध्ये मॅनचेस्टर युनायटेडमध्ये त्याने या पुरस्काराला गवसणी घातली. त्यानंतर २०१३, २०१४ मध्ये त्याने हा किताब जिंकला २०१६ मध्ये चौथ्यांदा तो या पुरस्काराचा मानकरी ठरला.
याशिवाय रोनाल्डोने २०१६-२०१७ मध्ये फीफा मेन्स प्लेयर ऑफ द ईयर चा पुरस्कार देखील काबीज केला. तर २०१६ मध्ये फीफा क्लब वर्ल्ड गोल्डन बॉल ऑफ द ईयर का अवॉर्ड वरही आपली मोहोर उमटवली.