WPL 2023: महिला प्रीमियर लीग 2023 (Womens Premiere League 2023) च्या पहिल्या सीजनमधील दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी केली. दिल्ली कॅपिटलल्सच्या आघाडीच्या फलंदाज शेफाली वर्मा (Shefali Verma) आणि मेग लँनिंगने (Meg Lanning) 10 ओव्हर्समध्येच 111 धावा केल्या होत्या. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतक ठोकत संघाच्या विजयाचा पाया रचला. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 60 धावांनी जिंकत पहिल्या विजयाची नोंद केली.
मेग लँनिंगने 167.44 च्या स्ट्राइक रेटने 43 चेंडूत 77 धावा केल्या. 15 व्या ओव्हरमध्ये तिने आपली विकेट गमावली. तिच्या पाठोपाठशाहदेखील बाद झाली. शेफालीने तब्बल 186.66 च्या स्ट्राइक रेटने 45 चेंडूत 84 धावांची स्फोटक खेळी केली. शेफालीने फक्त 31 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. शेफाली शतक ठोकेल अशी शक्यता वाटत होती. पण 16 धावांनी तिचं शतक हुकलं. शेफालीने 84 धावांच्या खेळीत 10 चौकार आणि चार षटकार लगावले. शेफालीच्या तुफान खेळीची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
How about THAT for a knock to get yourself going in the #TATAWPL @TheShafaliVerma was on a roll with the bat today in Mumbai
Relive her 84-run knock here #RCBvDC https://t.co/R4tzB5cqH7 pic.twitter.com/A1ZacieWXo
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 5, 2023
शेफाली वर्माने तुफान फटकेबाजी करत फक्त 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात प्रिती बोसच्या गोलंदाजीवर शेफालीने मिड ऑफवरुन एक जबरदस्त षटकार लगावला. हा षटकार पाहून अनेकांना विराट कोहलीने पाकिस्तानविरोधील सामन्यात लगावलेल्या षटकाराची आठवण झाली. सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
@TheShafaliVerma is dealing in boundaries here in Mumbai
Follow the match https://t.co/593BI7xKRy#TATAWPL | #RCBvDC pic.twitter.com/vXl5rOEgSh
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 5, 2023
या सामन्यात शेफालीने शतक ठोकलं असतं तर महिला प्रिमियर लीगमध्ये पहिलं शतक ठोकण्याचा मान तिला मिळाला असता. पण 16 धावांनी तिचं शतक हुकलं. पहिल्या विकेटसाठी शेफाली आणि मेगने 150 धावांची भागीदारी करत नवा रेकॉर्ड केला आहे. मेगने 43 चेंडूत 72 धावा केल्या. तिने एकूण 14 चौकार लगावले. दिल्ली कॅपिटल्सने यासह पहिला सामना 60 धावांनी जिंकत विजयी सुरुवात केली आहे.