कुस्तीपटू सुशील कुमार विरोधात FIR

रेसलर प्रवीण राणा आणि त्याचा भाऊ नवीन राणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आयपी स्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 30, 2017, 12:18 PM IST
कुस्तीपटू सुशील कुमार विरोधात  FIR

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याच्या विरोधात मारहाण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेसलर प्रवीण राणा आणि त्याचा भाऊ नवीन राणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी आयपी स्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

कॉमनवेल्थ गेम्स आणि सीनियर एशियन रेसलींग चॅम्पीयनशिपसाठी दिल्लीच्या केडी जाधव स्टेडीयमवर शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ट्रायल दरम्यान, प्रवीण राणा आणि सुशील कुमार यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. या वादातूनच सुशीलकुमारविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

दरम्यान, डीसीपी सेंट्रल एम.एम. रंधावा यांनी सांगितले की, सुशील कुमार आणि त्याच्या समर्थकांमध्ये FIR दाखल करणयात आली आहे. पोलिसांनी भा.दं.सं. 323 आणि 341 अन्वये सुशील कुमार याच्याविरोदात तक्रार दाखल केली आहे.