बापरे! विराट-अनुष्काची एकूण कमाई...ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

क्रिकेट आणि कलाविश्वातील ही सुप्रसिद्ध जोडी नेहमीच चर्चेचा विषय असते.

Updated: Mar 11, 2020, 05:34 PM IST
बापरे! विराट-अनुष्काची एकूण कमाई...ऐकून तुम्हीही चक्रावून जाल title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारतीय  क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. विराट कोहली, अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma)  लग्नबंधनात अडकल्यानंतर, विराट-अनुष्का ही जोडी आणखीनच चर्चेत आली. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनीही आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय उंची गाठली आहे. या जोडीबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक जण, त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. विराट-अनुष्का दोघांचंही देशातील श्रीमंत सलिब्रिटीजच्या यादीत नाव घेतलं जातं. पण कमाईच्या बाबतीत अनुष्का, विराटच्या मागे आहे.

२०१९ मध्ये आलेल्या फोर्ब्स सेलिब्रिटीच्या यादीमध्ये, विराट पहिल्या क्रमांकावर होता. तर अनुष्का २१व्या क्रमांकावर होती. २०१९ या गेल्या वर्षात विराटने २५२.७२ कोटींची कमाई केली. विराटकडे जवळपास ९०० कोटी इतकी संपत्ती आहे. 

तर अनुष्काने २०१९ मध्ये २८.६७ रुपये इतकी कमाई केली. अनुष्काकडे ३५० कोटींची संपत्ती आहे. या दोघांकडे मिळून, जवळपास १२०० कोटींहून अधिक संपत्ती आहे.

विराटच्या कमाईचा स्त्रोत, आंतरराष्ट्रीय किक्रेट सामान्यांमध्ये मिळणाऱ्या मानधनाशिवाय, आयपीएल आणि जाहिरातींसाठी मिळणारं मानधन हेदेखील आहे. अनुष्काने मोठ-मोठ्या चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या आहेत. ती बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग आहे. अनुष्काच्या कमाईचा स्त्रोत अवॉर्ड शो आणि जाहिराती आहेत. 

विराट-अनुष्काची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. विराट टेस्ट आणि वनडे सामन्यांमध्ये क्रमांक एकचा फलंदाज आहे. तर अनुष्काही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रातील, कामातील सुप्रसिद्ध, नामांकित सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची, कमाईची चर्चा तर होणारच...