VIDEO : आवाज न देता बॉलरने फिल्डरला फेकून मारला बॉल, दोघांमध्ये राडा

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL) ची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भलेही पाकिस्तान सुपर लीगला प्रेक्षक मिळत नसले तरी सामन्यांमध्ये रोमांच भरभरून आहे. रोज खेळाडू नवनवी रेकॉर्ड करत आहेत. 

Amit Ingole Updated: Mar 15, 2018, 02:59 PM IST
VIDEO : आवाज न देता बॉलरने फिल्डरला फेकून मारला बॉल, दोघांमध्ये राडा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL) ची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भलेही पाकिस्तान सुपर लीगला प्रेक्षक मिळत नसले तरी सामन्यांमध्ये रोमांच भरभरून आहे. रोज खेळाडू नवनवी रेकॉर्ड करत आहेत. 

पाकिस्तान सुपर लीग सामने दुबईमध्ये खेळले जात आहेत. पण या सामन्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाहीये. अशात पाकिस्तान सुपर लीगची लोकांकडून सोशल मीडियात खिल्ली उडवली जात आहे. अशातच पाकिस्तान सुपर लीगमधील एक मजेदार किस्सा सोशल मीडियात गाजत आहे. इतकेच काय तर इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केविन पीटरसन यानेही खिल्ली उडवली.

पाकिस्तान सुपर लीगच्या सर्वच सामन्यांमध्ये शानदार गोलंदाजी बघायला मिळत आहे. शाहिद आफ्रिदी आणि शाहीन आफ्रिदी हे दोघेही आपल्या गोलंदाजीने चर्चेचा विषय ठरले आहेत. पण नुकताच झालेला एक सामना खेळामुळे नाहीतर वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. 

लाहोर कलंदर आणि क्वेटा यांच्यात सामना खेळला जात होता. सामना निर्णायक वळणावर होता. अशातच असं झालं की, ना केवळ खेळाडू तर प्रेक्षक आणि कमेंटेटर्सही हैराण झाले. या सामन्यात सोहेल खान गोलंदाजी करत होता. सामन्याचा शेवटचा ओव्हर होता. यासिर शाह बाऊंड्री लाईनजवळ उभा होता. सोहेलला वाटत होतं की, यासिरने दुसरीकडे फील्डिंग करावी. अशाच त्याने जे पाऊल उचलले ते चर्चेत आले. 

सोहेल खानने यासिर शाहला आवाज देऊन सांगण्याऎवजी त्याच्यावर बॉल फेकून मारला. जे बघून सर्वचजण हैराण झाले. सोहेलने यासिर शाहला बॉल फेकून मारला. 

केविन पीटरसनने या घटनेचा उल्लेख करत लिहिले की, हा माझ्या क्रिकेट करिअरचा सर्वात गंमतीशीर क्षण आहे. गोलंदाजाने आवाज देण्याऎवजी फिल्डरला बॉल फेकून मारला.