एक घाव दोन तुकडं! पाकिस्तानी बॉलरने केले स्टम्पचे 2 तुकडे, तुम्हीही Video बघतच रहाल...

आसिफ महमूदने केले मिडल स्टंपचे 2 तुकडे, व्हिडीओ एकदा पाहाच...

Updated: Sep 20, 2022, 07:58 PM IST
एक घाव दोन तुकडं! पाकिस्तानी बॉलरने केले स्टम्पचे 2 तुकडे, तुम्हीही Video बघतच रहाल... title=

Middle stump broken: पाकिस्तानच्या क्रिकेट (Pakistan Cricket Team) संघाला फास्ट बॉलरची खाण समजलं जातं. इम्रान खान, स्विंगचा बादशाह वसीम अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर असा वारसा लाभलेलं पाकिस्तानचं घराणं आहे. सध्या पाकिस्तानी संघ शाहीन शाह अफरीदी आणि नसीम शहावर गर्व करतो. पाकिस्तानी बॉलर्स जगभरातील फलंदाजांच्या मनात धडकी भरवतात. अशातच आता पाकिस्तानला वेगाचा नवा बादशहा सापडला आहे.

पाकिस्तानला सापडलेला नवा गोलंदाज फक्त विकेट घेत नाही तर स्टम्पही मोडतो. आसिफ महमूदच्या (Asif Mahmood) रुपात पाकिस्तानचा नवा बॉलर (Pakistan's bowler) सापडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या नॅशनल टी-20 कपच्या (NationalT20) फायनलमध्ये आसिफ महमूदची भेडक गोलंदाजी पहायला मिळाली. आसिफ महमूदने टाकलेल्या एका चेंडूने मिडल स्टम्पचे थेट दोन तुकडे केले आहेत.

नॅशनल टी-20 कपचा फायनलचा सामना सिंध विरुद्ध पख्त्नख्वाह (KPvSINDH) असा सामना रंगला होता. सिंध करून गोलंदाजी करताना आसिफ महमूदने पख्त्नख्वाह संघाची कंबर मोडली. आसिफकडे शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी तिसऱ्या चेंडूवर आसिफला षटकार लगावला. पुढच्याच बॉलवर आसिफने बदला घेतला.

एक घाव दोन तुकडं!

19 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर इम्रान फलंदाजी करत होता. त्यावेळी पख्त्नख्वाह संघाच्या 139 धावा झाल्या होत्या. तर आणखी 2 विकेट हातात होते. त्यावेळी आसिफने इम्रानला जबरदस्त यॉकर टाकला. या चेंडू एवढा वेगवान होता की इम्रानला बॉल देखील दिसला नाही. बॉल थेट मिडल स्टप्मवर आदळला आणि स्टम्पचे दोन तुकडे झाले (Middle stump broken).

पाहा व्हिडीओ-

 

आसिफ महमूदच्या या यॉकर बॉलमुळे तो सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एवढंच नाही तर आसिफने नॅशनल टी 20 कपमध्ये पहिली हॅटट्रिक देखील घेतली होती. त्यामुळे आता पाकिस्तान संघाला नवा स्पीडचा बादशहा मिळालाय, असं म्हणण्यास हरकत नाही.