नवी दिल्ली: WWEच्या रिंगमध्ये तब्बल ११ वर्षानंतर पुनरागमन करणारा रेसलर बॉबी लॅश्लेचा इरादा काही वेगळाच दिसत आहे. पुनरागमनाच्या सुरूवातीलाच त्याने WWEचे स्टार रेसलर ब्रॉक लेस्नर आणि रोमन रेन्सला आव्हान दिले आहे. कदाचित त्यामुळे की काय, पण त्याने १५ जुलैला झालेल्या एक्स्ट्रीम रूल्स सामन्यात रोमन रेन्सला पराभूत केल्यावर ब्रॉकला आव्हान दिले होते. रॉनंतर दिलेल्या एका मुलाखतीत लॅश्लेने स्पष्टपणे सांगितले की, WWEमध्ये ब्रॉक लेन्सर आणि रोमन रेन्सला पराभूत करणे हेच आपले ध्येय आहे.
लॅश्लेने म्हटले आहे की, 'रोमन रेन्स माझ्यासोबत रिंगमध्ये उतरू शकत नाही. मला माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी केवळ रोमन रेन्सच रिंगमध्ये उभा आहे. मी WWEमध्ये पुनरागमन केले तेव्हा माझी दोनच ध्येयं होती. एक रोमन रेन्स आणि दुसरे म्हणजे ब्रॉक लेन्सर यांना पराभूत करणे. दोघांना पराभूत करून WWE यूनिव्हर्सल चॅम्पीयन बनणे हेच आपले अंतिम ध्येय आहे', असेही लॅश्लेने म्हटले आहे.
दरम्यान, एक्ट्रीम रूल्स जिंकल्यानंतर बॉबी लॅश्लेने ब्रोक लेस्नरला आव्हान दिले. दरम्यान, कर्ट एंगलनेही स्पष्टपणे म्हटले आहे की, जर ब्रॉक लेस्नरने लॅश्लेचे आव्हान स्वीकारले नाही तर, त्याच्याकडून युनिवर्सल टायटल काढून घेतले जाईल. पण, अडचण अशी आहे की, ब्रॉक लेस्नरसोबत खेळायचे असेल तर, लॅश्लेला पुढच्या आढवड्यात रोमन रेन्सला पुन्हा एकदा पराभूत करावे लागेल. रोमनसोतची लढत जर लॅश्ले जिंकतो तर, त्याचा त्याचा सामना थेट ब्रोक लेस्नरसोबत होईल. तोही समरस्लॅम यूनिव्हर्सल टायटलमध्ये.