मैदानाबाहेर वाद सुरु असतानाच टीम इंडिया मैदानात उतरणार

अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वादळ उठलं आहे.

Updated: Jun 22, 2017, 08:03 PM IST
मैदानाबाहेर वाद सुरु असतानाच टीम इंडिया मैदानात उतरणार

मुंबई : अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वादळ उठलं आहे. प्रशिक्षकपदाचा राजीनामा देताना कुंबळेनं विराट कोहलीला जबाबदार धरलं आहे. मैदानाबाहेर हे वाद सुरु असतानाच टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यामध्ये भारत ५ वनडे आणि एक टी-20 खेळणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतानं रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. या दोघांऐवजी भारतीय संघामध्ये रिषभ पंत आणि कुलदीप यादवची निवड करण्यात आली आहे.

असं आहे भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक

२३ जून- पहिली वनडे

२५ जून- दुसरी वनडे

३० जून- तिसरी वनडे

२ जुलै- चौथी वनडे

६ जुलै- पाचवी वनडे

९ जुलै- टी-20

भारतीय संघ : विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, रिशभ पंत, अजिंक्य रहाणे, एम.एस.धोनी, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर.अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, दिनेश कार्तिक