मुंबई : टी 20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, भारतीय संघाने 18 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध आपला पहिला वॉर्म अप सामना जिंकून आपली जोरदार तयारी दाखवली आहे. भारताने इंग्लंडचे 189 धावांचे लक्ष्य केवळ 3 विकेट गमावून पूर्ण केले. संघाची तयारी पक्की आहे, पण या स्पर्धेत भारताचा सामना सुरू होण्याआधी, आम्ही तुम्हाला टी 20 वर्ल्ड कपसंदर्भात असा एक किस्सा सांगणार आहोत, ज्यामुळे कूल कॅप्टन धोनी खूप चिडला.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये वीरेंद्र सेहवागला 2009मध्ये दुखापत झाली होती. रिपोर्टनुसार, तेव्हा वीरूने त्याच्या दुखापतीबद्दल त्याच्या सहकारी खेळाडूंपासून लपवले होते आणि त्याने मॅच खेळणे सुरू ठेवले होते.
परंतु त्याला ही दुखापत लपवून ठेवणे माहागात पडले कारण, यामुळे त्याला टी 20 वर्ल्ड कप 2009 मध्ये खेळता आले नाही. कारण तो ही टूर्नामेंट खेळण्यासाठी फिट नव्हता. सेहवागचं अनफिट असणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का होता.
असे मानले जाते की, धोनी या घटनेनंतर सेहवागवर खूप रागावला आणि दोन्ही खेळाडूंच्या नात्यात खूप तणाव निर्माण झाला. या टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब होती, ज्यामुळे ते दुसऱ्याच फेरीतून बाहेर पडले.
2009 मध्ये झालेल्या टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने पाच पैकी फक्त 2 सामने जिंकले. त्याला बांगलादेश आणि आयर्लंडकडून विजय मिळाला. परंतु वेस्ट इंडीज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा दारूण पराभव झाला. 2009 चे टी -20 विश्वचषक पाकिस्तानने जिंकले आणि त्यांनी अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला.
यावर्षी मात्र टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जाते. भारताचे सगळेच खेळाडू फिट आहे आणि सगळेच खेळाडू आपल्या सरावात व्यस्त आहेत.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि अक्षर पटेल.