T20 World Cup : इतिहास गवाह है! जो टॉस जिंकला तो सामना हरला; रोहित दोघांपैकी काय जिंकणार?

T20 World Cup India Vs England Toss : भारतीय संघ आज टॉस हरला तरी बेहत्तर; पण, सामना जिंकायलाच हवा... 

Updated: Nov 10, 2022, 12:48 PM IST
T20 World Cup : इतिहास गवाह है! जो टॉस जिंकला तो सामना हरला; रोहित दोघांपैकी काय जिंकणार? title=
T20 World Cup not a single team won the match after winning the toss in Adelaide Oval will rohit sharma loose

T20 World Cup India Vs England Toss : (Ind vs Eng) भारतीय क्रिकेट इंग्लंडशी दोन हात करत टी20 वर्ल्ड कपच्या Final मध्ये धडक मारण्यासाठी सज्ज झाला आहे. संघातील खेळाडूंची कामगिरी, दुखापतग्रस्त खेळाडूंना सावरण्यासाठीही मेहनत, संघातील उणीवा भरुन काढण्यासाठीची धडपड आणि चांगली कामगिरी करणाऱ्यांना प्रोत्साहन देत संघ टप्प्याटप्प्यानं पुढेही आला आहे. आता फक्त इंग्लंडला नमवलं, म्हणजे T20 World Cup च्या Final चं तिकीट कन्फर्म. (T20 World Cup not a single team won the match after winning the toss in Adelaide Oval will rohit sharma loose ). 

हे गणित वाटतं तितकं सोपं नाही. कारण, आतापर्यंत Adelaide Oval मध्ये जवळपास 11 टी 20 सामने झाले आहेत. पण, आकडे पाहता निकाल मात्र चकित करणारा आहे. 

Ind Vs Eng Live Updates T20 World Cup : इंग्लंडविरोधातील सामन्यावर पावसाचे ढग; पाहा सर्व माहिती एका क्लिकवर 

Toss जिंकतो तो संघ सामना गमावतो... 

कारण, जो संघ इथे (Adelaide Oval  मध्ये) Toss जिंकतो तो सामना जिंकत नाही. यंदाच्या टी20 वर्ल्ड कपचीच आकडेवारी पाहिली तर, अॅडलेड ओवलमध्ये आतापर्यंत 6 सामने झाले. यामध्ये जे संघ टॉस जिंकले त्यांना सामना गमवावा लागला. भारतीय संघ या मैदानात बांगलादेशविरोधात (Ind vs ban) खेळला. पण, यावेळी टॉस बांगलादेशनं जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाची करण्याचं आव्हान दिलं होतं. 

(Rohit sharma) रोहित शर्मानं आतापर्यंत 5 पैकी 4 सामन्यांमध्ये टॉस जिंकलाय 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं 5 सामन्यांमध्ये 4 वेळा टॉस जिंकला आहे. रोहितचं आणि टॉसचं हे खास कनेक्शन पाहता इंग्लंडविरोधातील सामन्यासाठी त्यानं टॉस जिंकण्याऐवजी सामनाच जिंकावा अशीच क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. 

सेमी फायनलच्या प्लेइंग 11 मध्ये कोण? 

भारतीय संघाची एकूण कामगिरी पाहता प्लेइंग 11 मध्ये फारसे बदल असतील अशा अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. कारण रोहितनं सुपर 12 फेरीमध्ये झालेल्या 5 पैकी 3 सामन्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नव्हता. उर्वरित दोन सामन्यांमध्ये जे बदल झाले ते फक्त 2 जागांसाठीच होते. आता यावेळी रोहित संघात कोणाला संधी देतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल. यामध्ये ऋषभ पंत की कार्तिक, अक्षर पटेल, दीपक हुड्डा की चहल , आणि ओपनिंग साठी के.एल. राहुलचं स्थान कायम राहणार की तिथेही बदल होणार याकडेच सर्वांचं लक्ष असेल.