पराभव झाला असला तरी पाकिस्तानात मात्र 'या' क्रिकेटरचं कौतुक होतंय...का?

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल मॅचमध्ये या खेळाडूने अर्धशतकी खेळी केली.    

Updated: Nov 12, 2021, 08:06 PM IST
पराभव झाला असला तरी पाकिस्तानात मात्र 'या' क्रिकेटरचं कौतुक होतंय...का? title=

मुंबई : पाकिस्तानचा विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) टी 20 वर्ल्ड कप 2021 (T 20 World Cup 2021) मध्ये धमाकेदार कामगिरी केली. टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यापासून ते ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल सामन्यापर्यंत रिझवानने धावा केल्या. रिझवानने या दोन्ही संघा विरुद्ध अर्धशतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहचवलं. मात्र सेमी फायनलमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. (t 20 world cup 2021 mohammad rizwan spent 2 nights in icu before Pakistan vs Australia 2nd Semi Final match) 

रिझवानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 52 चेंडूत 67 धावांची खेळी केली. मात्र रिझवानाची प्रकृती स्थिर नव्हती. तो पूर्णपणे फिट नव्हता. सेमी फायनल सामन्याआधी रिझवानला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा अपवाद वगळता याबाबत कोणालाच माहित नव्हतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar)

मात्र यानंतर रिझवानबाबत क्रिकेट चाहत्यांना माहित झालं. तेव्हापासून रिजवानचं कौतुक केलं जात आहे. रिजवानने खेळाप्रती दाखवलेल्या समर्पणासाठी त्याचं आजी माजी खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांकडून कौतुक केलं जात आहे.

फुप्फुसात संसर्ग

रिजवानला फुप्फुसात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र रिजवानचं लक्ष हे त्याच्या प्रकृतीपेक्षा ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सेमी फायनलकडे होतं. त्यामुळे हॉस्पीटलमधून परतताच रिजवान देशासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता देशाची जर्सी घालून मैदानात उतरला. रिजवानने सेमी फायनलमध्ये 67 धावा केल्या. त्याच्या या खेळीसाठी पाकिस्तानचा बॅटिंग कोच मॅथ्यू हेडनने कौतुक केलं.