लाल चौकात तिरंगा फडकवणाऱ्या त्या महिलेला रैनाने केलं सलाम

श्रीनगरमध्ये लाल चौकात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देणाऱ्या महिलेला क्रिकेटर सुरेश रैनाने सलाम केलं आहे. 

Updated: Aug 17, 2017, 11:23 AM IST
लाल चौकात तिरंगा फडकवणाऱ्या त्या महिलेला रैनाने केलं सलाम title=

नवी दिल्ली : श्रीनगरमध्ये लाल चौकात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देणाऱ्या महिलेला क्रिकेटर सुरेश रैनाने सलाम केलं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुनीता अरोडा या महिलेने जम्मू-काश्मीरमध्ये लाल चौकात धाडस करत घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

रैनाने बुधवारी ट्विट करत म्हटलं की, लाल चौकात भारत माता की जयच्या घोषणा देणाऱ्या काश्मिरी पंडित महिलेला माझा सलाम ही खूप बहादूर महिला आहे.

श्रीनगरमधून आल्यानंतर त्यांनी म्हटलं की, 'पोलिसांच्या घेऱ्यामध्ये देशभक्तीच्या घोषणा देतांना गौरव वाटत होता. त्या चौकात पोहोचण्यासाठी २० चौक्या पार कराव्या लागल्या. राष्ट्रीय ध्वज पर्समध्ये लपवून आणला.'