मुंबई : वेस्ट इंडिजचा फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याचा करिश्मा आजही टिकून आहे.
चंद्रपॉल अजूनाही काऊंटी क्रिकेटमध्ये खेळतात. त्यांचा धावा रचण्याचा धडाका वयाच्या ४३ व्या वर्षीही टिकून आहे.
काऊंटी टीममध्ये चंद्र पॉल खेळतात. इंग्लंड मध्ये लंकाशायरची टीम त्यांना पुढील वर्षीदेखिल खेळण्यासाठी प्रयत्न करत आहे. २०१७ मध्ये काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी शानदार फलंदाजी केली आहे. 50 हून अधिकच्या सरासरीने त्यांनी ८१९ धावा बनवल्या आहेत. यामध्ये ३ शतकांचा समावेश आहे. म्हणूनच पुढील वर्षीदेखील त्यांच्यासोबतचा करार असाच रहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
चंद्रपॉलदेखील याबाबत खुष आहेत. करारात वर्षभराची वाढ होण्याबाबत बोलताना ते म्हणाले,' २०१८ साठी मीदेखील उत्साही आहे. मी मागील सीझन एन्जॉय केला आहे. या क्लबमध्ये अनेक युवा खेळाडू आहेत. फलंदाजासोबत या संघाचा मेन्टॉर म्हणूनदेखील भूमिका साकरताना मला खूपच आनंद होत आहे. '
लंकाशायर व्यतिरिक्त चंद्रपॉल आधी डरहम, वारविकशर आणि डर्बीशर अशा ईंग्लिश काऊंटी क्लबसोबत खेळले आहेत. चंद्रपॉल यांच्या तुफान फलंदाजीमुळे लंकाशायर दुसर्या क्रमांकावर पोहचली आहे..