"भो*** दिसत नाहीये का?" कसोटी सामन्यात रोहितकडून सर्फराझ खानला शिवीगाळ? सोशल मीडियावर video viral

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला गेला. यातील आजच्या सामन्यातील रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.    

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 17, 2024, 10:36 PM IST
"भो*** दिसत नाहीये का?" कसोटी सामन्यात रोहितकडून सर्फराझ खानला शिवीगाळ? सोशल मीडियावर video viral title=
Photo Credit: @mrcricketer_7_18_4/Instgaram

Rohit Sharam: न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीचा दुसरा दिवस भारतीय क्रिकेट संघासाठी सर्वात वाईट सामना ठरला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतला. पण हा निर्णय भारतीय संघासाठी कामी न येत त्यांनी केवळ 46 धावा केल्या. एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली.  50 धावांच्या आत तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला तेव्हा कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. याच दरम्यान रोहित शर्मा मैदानावर आक्रमक मूडमध्ये दिसला. त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहितला राग आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, तो सर्फराझ खानला शिवीगाळ करत असल्याचा दावा केला जात आहे.

रोहित शर्माच्या या व्हिडिओचा ऑडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐकला तर तो सरफराजला मिस फिल्डिंगसाठी खडसावत आहे. यादरम्यान रोहितने काही अपशब्दही वापरले.

बघा व्हायरल व्हिडीओ

 

नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना भारतीय फलंदाज केवळ 46 धावांवरच मर्यादित राहिले. पहिल्या डावात भारतीय संघ 31.2 षटकात केवळ 46 धावा करू शकला. घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 293 कसोटींमध्ये ही संघाची सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. घरच्या कसोटी डावात भारतीय संघाला 50 धावाही करता आल्या नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय मायदेशातील कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध भारताचे ५ फलंदाज खातेही उघडू न शकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1999 मध्ये मोहाली कसोटीत असे घडले होते.