मुंबई : लीगच्या ११ व्या सीजनमध्ये आतापर्यंत १७ सामने झाले आहेत. आतापर्यंत या १७ सामन्यांमध्ये २४५ सिक्स आणि ४८७ फोर लागले आहेत. प्रत्येक सामन्यांमध्ये फोर, सिक्सचा थरार चाहत्यांना पाहायला मिळतो आहे. आताच्या सीजनमध्ये चेन्नई, पंजाब आणि कोलकाताच्या टीमने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. तर मुंबई, दिल्ली आणि बंगलुरुची सुरुवात यंदा इतकी चांगली राहिली नाही. बंगळुरुचा गोलंदाज क्रिस वोक्सने आतापर्यंत सर्वाधिक १० सिक्स दिले आहेत. दिल्लीचा बॉलर मोहम्मद शमीने त्याच्या ओव्हरमध्ये ९ सिक्स दिले आहेत. राशिद खान, वाशिंगटन सुंदर आणि ड्वेन ब्रावोने आतापर्यंत ८ सिक्स दिले आहेत.
वाशिंगटन सुंदर आणि ड्वेन ब्रावो चांगली कामगिरी करत आहेत. पण जर सगळ्यात जास्त सिक्स मारण्यात कोण पुढे आहे हे पाहिलं तर यामध्ये एका बॉलरचा नंबर लागतो. कोलकाताचा खेळाडू आंद्रे रस्सेल सगळ्यात पुढे आहे. ४ इनिंगमध्ये त्याने १७ सिक्स मारले आहेत. गेल याबाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे.
ख्रिस गेलने २ इनिंगमध्ये १५ सिक्स मारले आहेत. मागच्या २ सामन्यांमध्ये गेलने एक अर्धशतक आणि एक शतक ठोकलं आहे. गेल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यावर्षी १२ सिक्स मारणारा राजस्थान संजू सॅमसन तिसऱ्या स्थानावर आहे. इविन लुइस ११ सिक्ससह चौथ्या तर १० सिक्ससह एबी डिविलियर्स पाचव्या स्थानावर आहे.