IND vs PAK Clash : न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना खेळवला जातोय. पावसामुळे सामन्याला उशीर झाला होता. टॉस जिंकून पाकिस्तान संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टॉसवेळी रोहित शर्माचा मोठा गोंधळ (Rohit Sharma forgot toss coin) उडाल्याचं पहायला मिळालं. नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा टॉस कुठं आहे हे देखील विसरला. टॉसवेळी रोहितने रेफरीकडे कॉईन मागितला. तेव्हा बाबर आझमला (Babar Azam) हसू आवरलं नाही.
खरंतर रेफरीने रोहित शर्माकडे नाणं दिलं होतं. रोहितने हे नाणं खिशात ठेवलं होतं. मात्र, रोहितच्या हे लक्षात राहिलं नाही. रोहित रेफरीकडे नाणं मागू लागला. तेव्हा रेफरीने तुझ्याकडेच आहे, असं सांगितलं, तेव्हा त्याने खिशातून कॉईन काढला अन् हवेत उडवला. बाबर आझमला रोहितच्या या भोळेपणावर हसू आवरलं नाही.
पाहा Video
Rohit Sharma says where is the coin? Coin is inside his pocket.
- A typical Rohit moment! pic.twitter.com/KsTsmCPsKj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 9, 2024
टॉस जिंकून पाकिस्तान संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉस जिंकला असता तर आम्ही देखील गोलंदाजी केली असती, असं रोहित शर्मा म्हणाला. पाकिस्तान संघात एक बदल आहे. तर भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (WK), बाबर आझम (C), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (C), विराट कोहली, ऋषभ पंत (WK), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.