'रिटायर्ड आऊट' होण्याचा निर्णय अश्विनचा नव्हताच; कोणाच्या सांगण्यावरून अश्विनने असं केलं?

राजस्थान रॉयल्सच्या 19 व्या ओव्हरमध्ये आऊट नसतानाही अश्विनने कोणाचीही परवानगी न घेता मैदान सोडलं.

Updated: Apr 11, 2022, 01:22 PM IST
'रिटायर्ड आऊट' होण्याचा निर्णय अश्विनचा नव्हताच; कोणाच्या सांगण्यावरून अश्विनने असं केलं? title=

मुंबई : लखनऊ विरुद्ध राजस्थान सामन्यात असं काही घडलं जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. आयपीएलच्या इतिहासात याची नोंद झाली आणि हे करणारा आर अश्विन हा पहिला खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सच्या 19 व्या ओव्हरमध्ये आऊट नसतानाही अश्विनने कोणाचीही परवानगी न घेता मैदान सोडलं. याला रिटायर्ड आऊट असं म्हटलं जातं. मात्र अश्विनने असं का केलं याचा खुलासा कर्णधार संजू सॅमसनने केला आहे.

लखनऊविरूद्ध चांगली फलंदाजी करणारा रविचंद्रन अश्विन रिटायर्ज आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. या संपूर्ण प्रकरणाबाबत संजू सॅमसन म्हणाला, हा राजस्थान रॉयल्सचा निर्णय होता. आम्ही वेगवेगळे प्रयत्न करत राहतो. सिझनपूर्वी आम्ही याबद्दल बोललो होतो. आम्ही विचार केला की काही परिस्थिती उद्भवली तर आपण याचा वापरू शकतो. तो टीमचा निर्णय होता.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच खेळाडू 'रिटायर्ड आऊट'

आर अश्विन IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच रिटायर्ड आऊट होणारा हा पहिला खेळाडू ठरला. जेव्हा फलंदाज कोणतीही दुखापत झाली नसताना अंपायच्या परवानगी शिवाय मैदान सोडतो तेव्हा त्याला रिटायर्ड आऊट म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये आर अश्विनला जर मैदानात परत जायचं असेल तर तो जाऊ शकत नाही. एकदा खेळाडूनं रिटायर्ड आऊट घेतलं की तो पुन्हा मैदानात फलंदाजीसाठी येऊ शकत नाही. 

या सामन्यात आर अश्विनने 23 बॉलमध्ये 28 रन्सची खेळी केली. आर अश्विनने असं का केलं याबाबत स्पष्टीकरण दिलं नाही. मात्र तो थकल्यामुळे त्याने असं केल्याचा अंदाज लावला जात होता.